डेटिंग लाईफबद्दल पालकांनी मुलांसोबत बोलावे का? अजय देवगणचा किस्सा ऐका मग ठरवा

| Updated on: Nov 13, 2024 | 7:33 PM

तुम्हाला तुमच्या मुलांसोबत डेटिंग या विषयावर बोलायला किंवा चर्चा करायला आवडेल का? याचं उत्तर तुम्ही लगेच ‘नाही’ असं द्याल. पण, बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा किस्सा ऐकला की कदाचीत तुम्ही यावर विचार करायला लागाल. तसेच आपल्या मुलांसोबतही या विषयावर बोलाल.

डेटिंग लाईफबद्दल पालकांनी मुलांसोबत बोलावे का? अजय देवगणचा किस्सा ऐका मग ठरवा
ajay devgan
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

किशोरवयीन मुलांच्या पालकांसाठी ‘डेटिंग’ हा एक नवीन आणि संवेदनशील विषय आहे. ही अशी गोष्ट आहे ज्याबद्दल बहुतेक पालकांना बोलणे सोयीस्कर नसते. किंवा कसे बोलावे, ते बोलणे योग्य आहे का, असे अनेक प्रश्न पालकांना पडतात. पण, बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा किस्सा ऐकला की कदाचीत तुम्ही यावर विचार करू लागाल.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने सांगितले आहे की, त्याचा किशोरवयीन मुलगा युग त्याला त्याच्या डेटिंगचे किस्से सांगतो. तुम्हाला माहिती आहे की, अजय देवगण एक मैत्रीपूर्ण पिता आहे. जेव्हा युग हा त्याचे वडील अजय देवगणला त्याचे किस्से सांगत असतो तेव्हा वडील म्हणून अजय देवगणची मुलासोबत मैत्रिपूर्ण वागणूक असते. त्यामुळे मुलगा युगही आपल्या वडिलांसमोर मोकळा होतो. चला तर मग जाणून घेऊया आजकाल मुलांशी डेटिंगबद्दल बोलणं का गरजेचं आहे.

अजय देवगण हा बॉलीवूड स्टार आहे. तो केवळ एक चांगला अभिनेताच नाही तर एक जबाबदार आणि मैत्रीपूर्ण पिता देखील आहे. काजोल अनेकदा पालकत्वाविषयी बोलताना दिसली असली तरी अलीकडेच अजय देवगणने आपला मुलगा युग बद्दल बोलले आहे.

रणवीर शोच्या एका एपिसोडमध्ये त्याने सांगितले आहे की, त्याचा मुलगा 14 वर्षांचा झाला आहे आणि आता तो त्याच्यासोबत डेटिंग लाईफ शेअर करतो. आम्ही दोघंही मित्रांसारखे आहोत.

वास्तविक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, किशोरवयीन मुलांच्या पालकांसाठी डेटिंग हा एक नवीन आणि संवेदनशील विषय आहे. याविषयी बोलताना बहुतेक पालकांना बोलणे सोयीस्कर नसते. पालकांना या विषयावर बोलायला लाज आणि संकोच वाटतो. आपण अद्याप आपल्या मुलाशी या विषयावर बोलले नसल्यास, सुरुवात करा आणि हे का महत्वाचे आहे हे जाणून घ्या.

मुलांसोबत बोलल्याने ते सजग होतात

मुलांना भविष्यासाठी तयार करणे ही पालकांची मोठी जबाबदारी आहे. जेव्हा मुले मोठी होतात, तेव्हा डेटिंगच्या एका टप्प्यात प्रवेश करताना आपले मार्गदर्शन त्यांना जीवनाचा हा टप्पा पार करणे सोपे करते.

नातेसंबंध, डेटिंगबद्दल मोकळेपणाने बोलणे

अनेक तज्ज्ञांचे मत आहे की, मुलांनी नातेसंबंध आणि डेटिंगबद्दल प्रामाणिकपणे बोलले पाहिजे. याद्वारे मुले आपल्याला त्यांच्या मित्र-मैत्रिणी आणि नात्याबद्दल विनासंकोच सांगू शकतात. यानंतर, आपला थोडासा पाठिंबा मुलांना सर्वोत्तम पर्याय निवडण्यात मदत करू शकतो.

सकारात्मक संबंध तयार करण्यास मदत

मुलांशी डेटिंगवरील संभाषणाचा परिणाम आजच नव्हे तर भविष्यातही होतो. जर पालकांनी आपल्या किशोरवयीन मुलांशी असलेल्या संबंधांबद्दल मोकळेपणाने बोलले तर मुलांना त्यांच्या सीमा काय आहेत हे समजण्यास मदत होते. यामुळे त्यांना सकारात्मक संबंध निर्माण करणे सोपे जाते.

शारीरिक आकर्षण आणि भावनांमधील फरक समजून घेणे

आजकाल, बहुतेक किशोरवयीन मुलांसाठी डेटिंग म्हणजे शारीरिक आकर्षण. यामुळे मुलांचे नाते पुढे धोकादायक वळण घेऊ शकते. जर तुम्ही मित्र बनून मुलाला त्याच्या डेटिंग लाईफबद्दल विचारलं तर त्याला शारीरिक आकर्षण आणि भावनांमधला फरक समजेल.

मुलांना सुरक्षित वाटते

डेटिंगबद्दल मुलांशी बोलणे म्हणजे त्यांना जीवनातील सर्वात महत्वाच्या पैलूबद्दल समजावून सांगणे होय. डेटिंग लाईफबद्दल मुले आणि पालकांमधील संभाषण त्यांना नकारात्मक गोष्टींपासून वाचवतेच, शिवाय त्यांना अनेक गोष्टींपासून सुरक्षित देखील ठेवते.