हिवाळ्यात कुटुंबासोबत फिरायला जायचं, तर झारखंडमधील ‘ही’ ठिकाण करा एक्सप्लोर

| Updated on: Nov 29, 2024 | 3:31 PM

झारखंड हे अतिशय आकर्षक आणि सुंदर ठिकाण आहे, जिथे तुम्ही फिरण्याचा प्लॅन करू शकता. विशेषत: ज्यांना हिरवळीची जागा आवडते, ते येथे जाण्याचा बेत आखू शकतात. चला जाणून घेऊया झारखंडमधील काही प्रमुख पर्यटन स्थळांबद्दल.

हिवाळ्यात कुटुंबासोबत फिरायला जायचं, तर झारखंडमधील ही ठिकाण करा एक्सप्लोर
झारखंड पर्यटन स्थळं
Follow us on

आपल्या भारत देशातील झारखंड हे अतिशय सुंदर राज्य आहे, या राज्यात तुम्हाला पाहण्यासारखी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंब किंवा मित्रांसमवेत येथे फिरण्याची योजना आखू शकता. तुम्हाला देखील रोजच्या धकाधकीच्या दिनचर्येपासून व गर्दीपासून दूर कुठेतरी फिरायचं असेल तर झारखंडला जाण्याचा प्लॅन करू शकता. इथली घनदाट जंगलं आणि नैसर्गिक सौंदर्य तुमच्या मनाला भुरळ घालेल. आज आम्ही तुम्हाला झारखंडमधील काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जर तुम्हीही झारखंडला जात असाल तर तुम्ही ही ठिकाणं एक्सप्लोर करू शकता.

जमशेदपूर

झारखंडमधील जमशेदपूर हे ठिकाण फिरण्यासाठी खूप चांगले आहे. टाटा स्टील प्राणी उद्यान, ज्युबिली पार्क, डिमना तलाव, दलमा वन्यजीव अभयारण्य, हडको तलाव, भाटिया पार्क, जयंती सरोवर आणि ज्युबिली लेक अशा अनेक ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मुलांसोबत व कुटुंबासोबत इथे फिरायला जाऊ शकता.

हे सुद्धा वाचा

रांची

झारखंडची राजधानी रांची येथेही अनेक प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे आहेत. या ठिकाणी रांची लेक, रॉक गार्डन, कांके धरण, टागोर हिल, नक्षत्र वन, दशम धबधबा, जोन्हा धबधबा, पतरातू व्हॅली, हुंडरू धबधबा, बिरसा प्राणी उद्यान आणि पंचघाघ धबधबा अशा अनेक सुंदर ठिकाणांना तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत भेट देऊ शकता. तसेच तुम्हाला या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवण्यासाठी वेळ मिळू शकतो.

देवघर

झारखंड येथील देवघर हे भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. जर तुम्ही देवघरला जात असाल तर बाबा वैद्यनाथ धाम मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकता. तसेच श्रावण महिन्यात लाखो भाविक या देवस्थानी येऊन गंगाजल अर्पण करतात. तसेच येथून सुमारे २ किलोमीटर अंतरावरील नौलखा मंदिरात दर्शनासाठी जाता येते. नंदन पहाड हे देखील येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. याशिवाय देवघरमधील तपोवन लेणी आणि येथील आकर्षक टेकड्या देखील तुम्ही एक्सप्लोर करू शकतात.

हजारीबाग

तुम्हाला जर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर हजारीबागला भेट द्यायला जाऊ शकता. हे ठिकाण रांचीपासून सुमारे 95 किलोमीटर अंतरावर आहे. हजारीबाग तलाव, कॅनरी हिल्स, हजारीबाग वन्यजीव अभयारण्य, चमेली धबधबा आणि पद्मा किल्ला अशा अनेक ठिकाणांना भेट देता येते. याशिवाय हजारीबागपासून सुमारे ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या कहाप्रियमा गावात भगवान नृसिंहाचे मंदिर आहे, येथे दर्शनासाठी देखील जाऊ शकता.