मुंबई : मुंबईत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) चे भव्य उद्घाटन नुकतेच झाले होते. या सोहळ्याला देश-विदेशातील स्टार्स पोहोचले होते. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये NMACC बांधण्यात आले आहे. त्याठिकाणी झालेल्या या समारंभात रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक नीता अंबानी यांनी केलेल्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर या समारंभात सोन्याचा ब्लाऊज परिधान करुन आलेल्या त्या महिलेची चर्चा होत होती. ती महिला कोण आहे, हे जाणून घेऊ या…
कोण आहे ती महिला
प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर सुहानी पारेख (Suhani Parekh) मुकेश अंबानी यांच्या कार्यक्रमात आल्या. त्या स्वत: ज्वेलरी लेबल ‘MISHO’ चालवतात. ‘नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर’ मधील कार्यक्रमात त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्या गर्भवती आहेत आणि त्यांनी २४ कॅरेट सोन्याचा ब्लाऊज परिधान केला होता. त्यांचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
मॅटेलिक साडीत
5 अप्रैल 2023 रोजी सुहानी पारेख यांनी आपले काही फोटो शेअर केले. त्यात त्या मेटेलिक साडीत आहेत. तसेच 24 कॅरटचा रियल गोल्ड बेली आर्मरमध्ये बेबी बंपला फ्लॉन्ट केला होता.हे गोल्ड बेली आर्मरचे कवच अन् मॅचिंग गोल्डन ट्यूब ब्लाउज चांगले दिसत होते.
सोन्याच्या कवचावर लहान मुल
ब्लाऊज व सोन्याच्या चिलखतावर सुहानीने तिचा मुलाचा चेहरा कोरला होता. या लहान मुलांच्या चेहऱ्यावर सोनोग्राफी फोटोंज लावलेले होते. सुहानी म्हणतेय, परिवर्तनाचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. आमच्या लहान मुलाच्या चेहऱ्याचे सोनोग्राफी फोटो मेटल आर्मरवर कोरण्यात आले होते.
हे ही वाचा
NMACC च्या उद्घाटन कार्यक्रमात नीता अंबानी यांचा डान्स, पाहा Video