कुणीही हे सांगू शकत नाही की, मुलांची शाळा केव्हा सुरू होईल आणि सुरुवातीसारखे जीवन केव्हा सामान्य होईल. मुलांच्या सुरक्षेसाठी काही आईवडीलही घरीच काम करतात. हे असं केव्हापर्यंत चालणार हे सांगणं कठीण आहे. परंतु, वर्क फ्राम होमसह मुलांना सांभाळणे आईवडिलांना खूपच त्रासदायक ठरते.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन आल्यानंतर जगात पुन्हा लॉकडाऊनची शंका व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊन खुलला असला, तरी काही कंपन्या वर्क फ्राम होम करवून घेत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून मुलांच्या शाळाही व्यवस्थित सुरू झालेल्या नाहीत. अशात आईवडील दुहेरी भूमिका पार पाडत आहेत. एकीकडं पालकांना कार्यालयातील कामं करावी लागतात. तर, दुसरीकडं त्यांना मुलांचा सांभाळही करावा लागतो. तुम्ही जर या समस्येचा सामना करत असाल, तर या काही टिप्स तुमच्यासाठीच आहेत.
आपल्यापेक्षा आधी मुलांसाठी नियोजन करून द्या. कारण जेव्हा तुम्ही कामात असाल, तेव्हा ते त्यांचं काम करत राहतील. त्यांच्या जेवणाची वेळ, झोपण्याची वेळ, खेळ, अभ्यास तसेच इतर वेळेचंही नियोजन करून द्या. तुम्ही तुमचेही नियोजन करा. कारण तुम्हालाही घरची कामे केव्हा करायची आहेत आणि कार्यालयातील कामासाठी कोणत्या वेळेवर बसायचे आहे, हे ठरवावं लागले. शिवाय मुलांसाठीही वेळ काढून ठेवा.
मुलांना मोबाईल देण्याऐवजी त्यांच्या खोलीत त्यांना आवडतील अशी खेळणी ठेवा. कथेच्या पुस्तकं ठेवा. त्यात मुलं रममान होतील. जास्त वेळ मोबाईल देणे योग्य नाही.
तुम्ही तर घरी काम करून पैसे कमवता. तुमच्या कामात व्यस्त असता. मुलं तर बऱ्याच कालावधीपासून शाळा, मित्रांपासून दूर आहेत. त्यांच्यासाठी ही वेळ अतिशय महत्त्वाची आहे. ते आपल्या मित्रांसोबत व्हर्च्युअल कनेक्ट होतील, अशी व्यवस्था करा. त्यांच्यासोबत ऑनलाईन गेम थोड्या वेळासाठी का होईना खेळू द्या.
मुलं जेव्हा डुलगी घेतात, तेव्हा तुम्हीही त्या वेळेचा उपयोग करू शकता. यावेळी वर्क कॉल आणि मिटिंग्स संपवून टाका. जेणेकरून मुलांच्या आवाजाचा त्रास होणार नाही. मुलांना घरीच खेळण्यासाठी काहीतरी द्या जेणेकरून ते थकून लवकर झोपी जातील.
मुलांना काही गोष्टी शिकवाव्या लागतात. त्यांना काही हातवारे करायला शिकवा. तुम्ही कामात असाल, तुम्हाला डिस्टर्ब करायचं नसेल, तर तोंडावर बोट ठेवून त्यांना शांत राहा, असं चिन्हांचा वापर करून सांगता येईल. अशापद्धतीनं मुलांसोबत संवाद साधता येतो.