Yoga Asanas | फिट आणि ताजेतवाने राहण्यासाठी नियमित करा योगासन

| Updated on: Dec 28, 2021 | 4:42 PM

आंतरिक शांती प्राप्त करणे सोपे नाही. परंतु, त्यासाठी योग मदत करतो. योग आंतरिक ज्ञान प्राप्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

Yoga Asanas | फिट आणि ताजेतवाने राहण्यासाठी नियमित करा योगासन
फेस योग - योगात प्राण मुद्रा, मकर मुद्रा, हाकिनी मुद्रा असे काही आसन आहेत. हे आपल्या त्वचेला तजेली ठेवतात. ही आसन सायनसच्या छिद्रांना साफ करतात. तणाव दूर करतात. डोळे आणि नाकाला साफ करण्यास मदत करतात. या आसनांशिवाय त्वचा तजेलीदार ठेवण्यासाठी शीर्षासन, बकासन, कर्णपिडासन यासारखी आसन केली जातात. या चेहऱ्याच्या योगासनांनी शरीरातील टॉक्सिन बाहेर काढण्यास मदत होते. छिद्र साफ होतात.
Follow us on

योग तुमच्या शारीरिक आणि मानसिक पद्धतीनं आरोग्यदायी ठेवण्यासाठी मदत करतो. जर तुम्हाला फिट राहायचे असेल, तर येणाऱ्या दिवसांत या योग प्रकारांना आपल्या दिनचर्येत सहभागी करा.

कुंडलिनी योग – योगाचे रूप ऊर्जेला सक्रिय करण्यासाठी केला जातो. असं समजलं जाते की, कुंडलिनी योग आपल्या शरीराला अस्तित्वात असलेल्या ऊर्जेला जागरुक करते. हा योग केल्यानं आपल्या शरीरातील लपलेली शक्ती जागृत होण्यास मदत मिळते.

हट योग – हट योगात योग मुद्रा आणि श्वास घेण्याची पद्धतीचा समावेश होतो. नियमित आसनांच्या तुलनेत हळुवार गतीनं योग केला जातो. संस्कृतमध्ये हटचा अर्थ होतो बळ. योगाच्या रुपानं पारंपरिक पद्धतीनं बळ तयार केले जाते.

मेंदूची क्षमता वाढविण्यासाठी योग – आंतरिक शक्ती, तणावमुक्त मन जीवनात आपले अंतिम लक्ष्य असते. कारण आपण मानसिक आणि शारीरिक रुपानं फिट राहतो तेव्हा खऱ्या अर्थानं आरोग्यसंपन्न असतो. आंतरिक शांती प्राप्त करणे सोपे नाही. परंतु, त्यासाठी योग मदत करतो. योग आंतरिक ज्ञान प्राप्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मनाला शांत करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी काही आसनं जसे वाईड लेग फॉरवर्ड बेंड पोज, बद्धकोणासन आणि वज्रासन महत्त्वाचे आहेत.

 

Common Lifestyle Mistakes: पाच अशा चुका ज्या देतात अनेक आजारांना आमंत्रण; या सवयी आजच सोडा

Urvashi Rautela | अभिनेत्रीच्या लूकनं चाहते घायाळ; उर्वशी रौतेलाच्या ड्रेसची जाणून घ्या किंमत!