Holi 2023 : रंगांचा लुटायचा असेल तर आनंद तर या टिप्सच्या मदतीने घ्या डोळ्यांची काळजी

| Updated on: Feb 25, 2023 | 10:37 AM

रंगांचा सण म्हटला जाणारा होळी हा खूप आनंद आणि आपुलकी घेऊन येतो. पण या सणाच्या उत्साहात अनेकवेळा आपण डोळ्यांची काळजी घ्यायला विसरतो.

Holi 2023 :  रंगांचा लुटायचा असेल तर आनंद तर या टिप्सच्या मदतीने घ्या डोळ्यांची काळजी
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : होळीचा (holi) सण जवळ आला आहे. थोड्याच दिवसात विविध रंग, फुगे, पिचकारी यांनी रस्त्यावरील दुकाने भरून जातील. होळी हा रंगांचा सण (colors) भारतातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक मानला जातो. या दिवशी सर्वत्र तेजस्वी आणि आनंदी वातावरण पाहायला मिळते. लोकांचे चमकदार रंग आणि त्यांचे कपडे हे जग किती रंगीबेरंगी आणि आनंदी आहे याची कल्पना देतात. फक्त दृष्टीकोन असावा. दृष्टीबद्दल बोलताना डोळ्यांचा उल्लेख करणं आवश्यक ठरतो. रंग खेळण्यापूर्वी आपण आपली त्वचा, केस खराब होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतो, तेल वगैरे लावून तयारी करतो. पण डोळ्यांच्या (eye care) बाबतीतही अशीच पुरेशी काळजी घेतली जाते का ?

होळीच्या दिवशी समोरच्या व्यक्तीला रंग लावण्याच्या उत्साहात अनेकांचे भान हरपून जाते आणि परिणामी त्यांचा चेहरा, नाक, कान, डोळे दुखावतात. तुमच्यासोबतही असे घडले असेल आणि या वर्षी तुमच्या डोळ्यांना कोणताही त्रास वा हानी होऊ नये असे वाटत असेल येथए नमूद केलेल्या गोष्टींचा अवलंब करून डोळ्यांची पुरेशी काळजी घ्या.

हे सुद्धा वाचा

होळीच्या रंगांपासून डोळे वाचवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

स्वच्छ पाण्याने डोळे धुवावे

होळी खेळताना डोळ्यांभोवती किंवा डोळ्यांत रंग गेल्यास तो नेहमी स्वच्छ आणि पिण्याच्या पाण्याने धुवावा. डोळे स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी देखील वापरू शकता. गुलाबपाणी डोळ्यातील रंगद्रव्याचे डाग आणि धूळ काढण्यास मदत करते. गुलाबपाण्यामध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म देखील असतात. तसेच, रसायनांमुळे प्रभावित झाल्याने डोळ्याची जळजळ कमी होत असेल तर तेही कमी करण्यास मदत करते.

आयड्रॉप्सचा करा वापर

रंग खेळून झाल्यावर तुमचे डोळे थंड पाण्याने स्वच्छ धुवावेत. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आयड्रॉप्सचा वापर करा. बाजारात विविध आयड्रॉप्स उपलब्ध आहेत, डोळ्यांची कोणतीही ॲलर्जी टाळण्यासाठी ते वापरण्याची शिफारस केली जाते. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही ड्रॉप्स वापरू नका अन्यथा नुकसान होऊ शकते. आयड्रॉप्स वापरल्याने तुमच्या डोळ्यांना खाज सुटणे आणि तसेच डोळे दुखणे यापासून आराम मिळेल. होळी खेळण्यापूर्वी आणि नंतर थोडे थेंब डोळ्यात घालावेत.

सनग्लासेस अथवा चष्मा वापरा

जेव्हा कोणी चेहऱ्यावर रंग लावायचा प्रयत्न करत असेल तर नेहमी डोळे बंद करा. त्यामुळे डोळ्यात रंग जाण्याची शक्यता नाहीशी होते. तसेच, बाहेर जाण्यापूर्वी सनग्लासेस किंवा हॅन्डी शेड्स घाला. यामुळे तुम्ही मस्त दिसाल आणि तुमच्या डोळ्यांचे संरक्षणही कराल.

मॉयश्चरायजर किंवा खोबरेल तेलाचा करा वापर

रंग खेळायला जाण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्याला तसेच डोळ्याभोवती चांगले मॉयश्चरायझर वापरा जेणेकरून तुमच्या डोळ्याभोवती कोणताही रंग जमा होणार नाही. कोल्ड क्रीम होळीच्या रंगांपासून संरक्षण करण्याचे काम करते. होळी खेळण्यापूर्वी तुम्ही डोळ्याभोवती खोबरेल तेलही लावून मालिश करू शकता. क्रीमप्रमाणेच नारळाचे तेल तुमच्या डोळ्यांत रंग जाण्यापासून प्रतिबंधित करेल.

होळी खेळण्यापूर्वी डोळ्यांची काळजी घेण्याच्या टिप्सपैकी ही एक उत्तम टीप आहे. विशेषतः रासायनिक रंगांच्या दाणेदार व छोट्या कणांपासून सावध असले पाहिजे. ते विषारी असतात आणि कॉर्नियाला प्रभावित करू शकतात. डोळ्यांच्या या त्रासामुळे तीव्र वेदना होतात आणि व्रण किंवा संसर्गाचा विकास होणे रोखण्यासाठी तज्ञांकडून उपचार करणे आवश्यक आहे.