लग्नाआधी पार्टनरला विचारा ‘हे’ 5 प्रश्न, अनेक अडचणी एकाच वेळी सुटतील

| Updated on: May 07, 2024 | 3:43 PM

Marriage Life | लग्नाआधीच काही गोष्टी क्लिअर झालेल्या बऱ्या, असं आपण अनेकदा म्हणतो. म्हणून लग्नाआधी पार्टनरला 'या' 5 गोष्टी नक्की विचारा, नंतर होणार नाही पश्चाताप... लग्न आयुष्यातील फार मोठा टप्पा आहे. त्यामुळे काही गोष्टींची काळजी नक्की घ्या...

लग्नाआधी पार्टनरला विचारा हे 5 प्रश्न, अनेक अडचणी एकाच वेळी सुटतील
marriage
Follow us on

लग्न मुलगा – मुलीच्या आयुष्यातील फार मोठा टप्पा आहे. त्यामुळे लग्नाआधी काही गोष्टींचा विचार आणि लग्नाआधीच काही गोष्टी क्लिअर झालेल्या बऱ्या असतात. आपण कोणासोबत लग्न करतोय, ज्या व्यक्तीसोबत आपण संपूर्ण आयुष्याचा विचार करत आहोत ती व्यक्ती कशी आहे… त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे.. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर लग्नासाठी होकार द्यावा. कारण चुकीचा व्यक्ती पार्टनर म्हणून निवडल्यास लग्नानंतर अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जीवनसाथी निवडण्याआधी तुम्ही त्यांच्याशी बोलून काही गोष्टी आधी क्लिअर करणे गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला लग्नानंतर भविष्यात अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि तुम्ही आनंदी जीवन जगाल..

आवड – निवड : तुम्हाला तुमच्या पाटर्नरबद्दल काही गोष्टी माहिती असायला हव्यात. जी व्यक्ती आपल्या आयुष्यात येणार आहे, तिला काय आवडतं, तिचे छंद काय आहे, ती / तो कोणत्या क्षेत्रात काम करतोय यासर्व गोष्टी मुला-मुलीने एकमेकांना विचारणं गरजेचं असते. ज्यामुळे आवडी कळतात.

करियर प्लान : आयुष्यात करियर फार महत्त्वाचं आहे. ज्याचा प्रभाव आपल्या भविष्यावर होतो. त्यामुळे लग्नाआधी तुम्हाला करियर प्लान करणं फार महत्त्वाचं आहे. शिवाय एकमेकांच्या करियर संबंधी गोष्टी देखील शेअर केल्या पाहिजेत. यावेळी दोघांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी अधिक गरज असते.

कुटुंब नियोजन : बऱ्याच जोडीदारांना लवकर मुलं व्हावी अशी इच्छा असते तर काहींना त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील पहिली काही वर्षे एन्जॉय करायला आवडतो. याबद्दल तुमच्या जोडीदाराशी बोला आणि त्याचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण यामुळे, नंतर भांडण होण्यापेक्षा आधी याबद्दल जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. दोघांनाही सहमती देऊन निर्णय घेणं केव्हाही योग्य ठरेल.

आर्थिक स्थिती : आजच्या बदलत्या काळात जोडीदाराच्या आवडी-निवडीबरोबरच एकमेकांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घेणं खूप गरजेचं झालं आहे. ज्यामुळे पुढील खर्चात नियोजन करण्यात येतं. शिवाय लग्नाचा खर्च देखील मिळून करता येईल. . यामुळे एकमेकांवर फारसा दबाव येणार नाही. शिवाय भविष्यात पैसे वाचवणे आणि खर्च करण्याबद्दल देखील चर्चा करू शकता.