‘आरोग्यम् धनसंपदा’असे नेहमी म्हटले जात असते. चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप अन् व्यायाम हे गमक आहे. शरीराला दीर्घ काळासाठी तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामाला (exercise) महत्व असते. परंतु व्यायामापेक्षाही एक असा नृत्य वा डान्सचा प्रकार जो शरीराला चांगले फायदे देतो, हे सांगितल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु हे खर आहे. झुंबा डान्सच्या (Zumba dance) माध्यमातून शरीराला अनेक चमत्कारी फायदे (surprising benefits) मिळत असतात. झुंबा डान्स हा इतर व्यायामांपेक्षा ते अधिक फायदेशीर आहे. यामुळे स्नायूंना बळकटी मिळत असते. पोटावरील तसेच शरीराच्या इतर भागातील चरबी कमी होते आणि कॅलरी बर्न करण्यास मदत होते.
जेव्हा आपण झुंबा डान्स करतो तेव्हा शरीराच्या हालचाली वेगाने होतात यातून स्नायूंना चांगला रक्तपुरवठा होतो आणि ते मजबूत होतात. काही आठवड्यांत, तुम्हाला झुंबा वर्कआउट्सचे फायदे पाहायला मिळतील.
झुंबा वर्कआउटमुळे शरीरात प्रसन्न हार्मोन सेरोटोनिनची निर्मिती होउन मनातील ताण-तणाव दूर होतो. तुम्हाला प्रसन्न वाटत असते. मानसिक ताण कमी झाल्याने याचा सकारात्मक परिणाम हा आपल्या शरीरावर जाणवत असतो.
झुंबा वर्कआउट केल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि रक्तवाहिन्या चांगल्या प्रकारे प्रवाहीत होत असतात. त्यामुळे आपोओप आपल्या शरीरातील रक्तदाब कमी होत असतो. यामुळे ह्रदयाशी संबंधित अनेक समस्या दूर होताता.
जेव्हा आपण झुंबा डान्स करतो तेव्हा शरीराचे सर्व स्नायू ताणले जातात. त्या माध्यमातून ते अधिक सक्रिय होतात आणि हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे हा कार्डिओ वर्कआउटही मानला जातो. 40 मिनिटांचा झुंबा वर्कआउट करून सुमारे 370 कॅलरीज बर्न केल्या जाऊ शकतात.
झुंबा डान्समुळे शरीर लवचिक होण्यास मदत मिळत असते. त्याच प्रमाणे मेंदूपर्यंत रक्तपुरवठा चांगला होत असल्याने शारीरिक व मानसिक क्षमताही वाढण्यास मदत मिळत असते.
इतर बातम्या-