मुंबई : हायकोर्टाने अकरावी प्रवेशासाठीची CET परीक्षा रद्द केल्यानंतर, राज्याच्या शिक्षण विभागाने नवा निर्णय घेतला आहे. अकरावी प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु केली असून MMRDA विभागासाठीच्या प्रक्रियेची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शेअर केली आहे. वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर केलं आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागासाठी 11 वी प्रवेश प्रक्रिया असून, राज्यातील उर्वरित भागात महाविद्यालय पातळीवर प्रवेश होतील. यानुसार 14 ते 22 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, विद्यार्थ्यांचे अर्ज, अर्जांची छाननी, दुरुस्तीची प्रक्रिया पार पडेल. (Important information of Varsha Gaikwad regarding 11th admission)
महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना आणि सर्वांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे बंधनकारक आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज यासंदर्भात माहिती देताना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही ट्विट केले आहे. राज्य सरकारने अकरावी सीईटी परीक्षेसाठी काढलेला अध्यादेश मुंबई हायकोर्टाने रद्द केला आहे. मुंबई हायकोर्टाचा निकाल वाचून पुढील निर्णय घेऊ, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. तसेच त्यांनी यासंदर्भात संपूर्ण वेळापत्रक ट्विट केले आहे. त्यानुसार 14 ऑगस्टच्या सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुरुवात होणार आहे. विद्यार्थी स्वतःचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करून हे रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत. नियमित प्रवेशाचा पहिला राउंड 22 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.
Announcement: Process for Centralised Online Admissions to #FYJC 2021-22 for the Mumbai Metropolitan Region, & areas within municipal corporation limits in Pune, Pimpri Chinchward, Nagpur, Amravati, Nashik. For more details, refer https://t.co/Sn9eIi9Ahc. (1/2) @msbshse pic.twitter.com/NAsZiq4ItT
— मैं_भी_Rahul (@VarshaEGaikwad) August 13, 2021
दरम्यान, राज्यात 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा महत्वाचा निकाल दिला. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.राज्य सरकारनं अकरावी सीईटी परीक्षेसाठी काढलेला अध्यादेश मुंबई हायकोर्टानं रद्द केला आहे. मुंबई हायकोर्टाचा निकाल वाचून पुढील निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
अकरावीच्या प्रवेशासाठीची साईटी परीक्षेसंदर्भात आज हायकोर्टाने निर्णय दिला आहे. अकरावी अॅडमिशन प्रोसेससाठी पुढे काय करता येईल यासाठी आम्ही अभ्यास करतो आहे. उच्च न्यायालयानं काय म्हटलं आहे ते पाहून पुढील निर्णय घेऊ, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी टीव्ही 9 मराठी सोबत बोलताना सांगितलं आहे.
संबंधित बातम्या :
Important information of Varsha Gaikwad regarding 11th admission