पालघरमध्ये 12 लाख रोजगार, 1 हजार कोटींची गुंतवणूक होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

| Updated on: Aug 30, 2024 | 3:22 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज मोदींच्या हस्ते वाधवन बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार स्थापन केले जाणार आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ असलेले वाधवन बंदर हे भारतातील सर्वात मोठ्या खोल जल बंदरांपैकी एक असेल आणि आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.

पालघरमध्ये 12 लाख रोजगार, 1 हजार कोटींची गुंतवणूक होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
Follow us on

वाढवन बंदराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी पालघरमध्ये आले आहेत. त्यामुळे पालघरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मोदीच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमिपूजन झाल्यानंतर ते मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्येही सहभागी होणार आहेत. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘आजचा दिवस पालघरच्या इतिहासात महाराष्ट्राच्या व देशाच्या इतिहासातील सोनेरी दिवस आहे. हा प्रकल्प गेम चेंजर प्रकल्प आहे. महाराष्ट्राला तर याचा फायदा होईलच, पण आपल्या देशाला व पालघरच्या जनतेला सर्वाधिक होईल. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन होत आहे.’

‘मोदींच्या हातात सफलतेचा पारस आहे. जसे भूमिपूजन झाले, तसेच बंदराचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल, असा विश्वास व्यक्त करतो. त्यांच्या हस्ते भूमिपूजन व्हावा असा योग असणार. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर हे बंदर मार्गी लागत आहे.’

स्थानिकांना रोजगार, नोकरी मिळेल – शिंदे

‘डहाणू पालघर हे जगाच्या नकाशावर मोलाचे स्थान मिळवणार आहे. हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहे. या बंदरामुळे आयात व निर्यातीस चालना मिळेल. भारत जागतिक व्यापारात अजून समर्थ पणे उतरू शकेल. स्थानिकांना रोजगार, नोकरी मिळेल. वाढवण बंदर विकासात मच्छीमार बंदर व स्थानिकांना न्याय दिला जाईल. कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. पर्यावरणाची आपण काळजी घेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपण चालवत आहोत. आता नरीमन पॉईंट पासून कोस्टल रोड विरार, ते पालघर पर्यंत आणण्याचा सरकारचा विचार आहे.’

‘मुंबईला वैष्विक फिनटेक शहरात बदलणार’

‘सिंगापूर, कोलंबो या बंदरांवर आता भारताला अवलंबून राहावे लागणार नाही. दिघी पोर्टच्या विकासाला केंद्र सरकारने आता हिरवा झेंडा दाखवला आहे. म्हणून दिघी पोर्ट शेजारी हे दुसरे औद्योगिक मोठे बंदर असेल. पंतप्रधानांचे मी आभार मानतो. मुंबईला वैष्विक फिनटेक शहरात बदलण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.’