मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओमिक्रॉनचे संकटही आणखी वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी आजपासून लहान मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. संपूर्ण राज्यात यासाठी खास नियोजन करण्यात आले आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी कोवीनवर नाव नोंदणी करता येते. तसेच ऑफिलाईन पद्धतीने प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊनही लस देण्याची सुविधा करण्यात आलीय. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसारख्या मोठ्या शहरांसह पूर्ण राज्यात 15 ते 18 वर्षे या वयोगटातील मुलांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे उद्दीष्ट सरकारने समोर ठेवले आहे.
संपूर्ण देशात लहान मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्याचे निर्देश केंद्र सरकारने यापूर्वी दिलेले आहेत. केंद्राच्या सूचनेप्रमाणे लहान मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी https://www.cowin.gov.in या वेबसाईटवर जाऊन नावनोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येते. 15 ते 18 वर्षे या वयोगटातील मुलांचे आधारकारर्ड तसेच आधारकार्ड नसेल तर शाळेतील ओळखपत्राच्या मदतीने लसीसाठी नाव नोंदवता येते. कोवीन या वेबसाईटवर गेल्यानंतर अॅड मोअर या बटनावर क्लिक करुन एका मोबाईल क्रमांकाच्या मदतीने चार मुलांच्या लसीकरणासाठी नोंद केली जाऊ शकते.
लहान मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली असली तरी 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना लस दिली जाणार नाही. ज्या मुलांचा जन्म 2007 साली किंवा त्यापूर्वी झालेला आहे, ही मुलं लस घेण्यास पात्र आहेत. त्यासाठी मुलांकडे शाळेच ओळखपत्र किंवा आधारकार्ड असणे अनिवार्य आहे. मुलांना कोव्हॅक्सिन लसीचे डोस देण्यात येणार आहेत. तसेच पालकांच्या तसेच मुलांच्या मोबाईल क्रमांकावरुन लसीकरणासाठी नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
राज्यात 15 ते 18 वयोगटातील 60.63 लाख मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. यात नांदेड 1 लाख 81 हजार, जालना 1 लाख 9 हजार, लातूर 1 लाख 34 हजार, उस्मानाबाद 86 हजार, हिंगोली 65 हजार, बीड 1 लाख 42 हजार, परभणी 1 लाख1 हजार, नाशिक 3 लाख 43 हजार, मुंबई 6 लाख 12 हजार, पुणे 5 लाख 53 हजार अमरावती 49 हजार मुलांना डोस दिला जाईल. तर औरंगबााद जिल्ह्यात 2 लाख 13 हजार 823 मुलांचे लसीकरण केले जाईल.
इतर बातम्या :