बीड: दोन-चार नव्हे तर तब्बल 19 महिने 700 कामगारांना पगारच मिळालेला नसल्याने या कामगारांनी पांगरी येथील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ साखर कारखाना आज बंद केला असून हे कामगार संपावर गेले आहेत. जोपर्यंत पगार मिळत नाही, तोपर्यंत कारखाना सुरू करणार नसल्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे. दरम्यान, कारखाना बंद करताना कामगार व अधिकारी यांच्यात बाचाबाची झाल्याने या परिसरातील वातावरण काही काळ तणावाचे झाले होते. (19 months salary exhausted workers shut down pankaja munde factory)
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षा आहेत. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी कायम ऊसतोड मजूरांच्या हिताचे राजकारण केले. पण, तत्कालिन परिस्थितीत राष्ट्रवादी – काँग्रेसला शह देण्यासाठी त्यांनी साखर कारखानदारीतही पाय ठेवला होता. मजूर आणि कारखानदारी यात सुवर्णमध्य साधण्याची किमयाही त्यांनी करुन दाखविली होती. एकेकाळी वैद्यनाथ कारखाना आशिया खंडात नावाजला गेला. परंतु, मागच्या काही वर्षांपासून व्यवस्थापनातील काही दोष, कायम पडणारा दुष्काळ यामुळे कारखाना अडचणीत आलेला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी अनेक दिवस आंदोलन केले होते. दरम्यान, आताही कर्मचाऱ्यांचे 19 महिन्यांचे वेतन थकलेले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी कारखान्याचे कार्यकारी संचालक दिक्षतलू यांना निवेदन दिले होते.
दहा दिवसाचा अल्टिमेटम
थकीत पगार १० दिवसांत खात्यात वर्ग करा, अन्यथा आम्ही कारखाना बंद करू, असा इशारा या कामगारांनी दिला होता. दहा दिवस लोटूनही पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळपासूनच कारखाना बंद केला असून यात वजन काटा व सर्व कार्यालयाचे कर्मचारी, उत्पादन युनिटचे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.
पंकजा यांच्या भूमिकेकडे लक्ष
या संपाबदल कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. कारण पंकजा यांनी अनेक अडचणीतून हा कारखाना यंदा सुरू केला होता. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळालाही होता. मात्र कर्मचाऱ्यांचे पगार मात्र थकीत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांनी हे संपाचे हत्यार उपसले आहे.
कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी आमने सामने
कामगारांनी आज सकाळी हा कारखाना बंद करून संप पुकारला. यावेळी काही अधिकाऱ्यांनी कामगारांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कामगार आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक पुरभे यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, गेल्या 19 महिन्यांपासून पगारच झाला नसल्याने कामगार हवालदिल झाले आहेत. (19 months salary exhausted workers shut down pankaja munde factory)
Maharashtra Budget 2021 LIVE : महाराष्ट्र अर्थसकंल्पीय अधिवेशन 2021 लाईव्ह https://t.co/kgNZb4EPhu
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 10, 2021
संबंधित बातम्या:
भाजप आमदार गणेश नाईक अजित पवारांच्या भेटीला
विठ्ठल उमप यांचा आवाज ऐकून मन्ना डे काय म्हणाले?; वाचा, लोकशाहीराचा किस्सा!
Sachin Vaze News Live | माझा कुणीतरी पाठलाग करतंय : सचिन वाझे
(19 months salary exhausted workers shut down pankaja munde factory)