संतोष जाधव, Tv9 मराठी, धाराशिव | 24 नोव्हेंबर 2023 : तुळजाभवानी देवीच्या चरणी भक्तांनी लाखो कोट्यवधी रुपयांचं सोने आणि चांदी अर्पण केलं आहे. आता मंदीर प्रशासन हे सोनं आणि चांदी वितळवणार आहे. विशेष म्हणजे तुळजाभवानीच्या तिजोरीतील सोने आणि चांदी वितळवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. भक्तांनी 2009 पासून 2023 पर्यंत 207 किलो सोने आणि 2 हजार 570 किलो चांदी देवीच्या चरणी अर्पण केली आहे. हे सोने-चांदी वितळवण्यासाठी गठीत करण्यात आलेली समिती आपल्या कामालादेखील लागली आहे. ही समितीचे सदस्य सोने वितळवने नियमावली करण्यासाठी शिर्डी देवस्थानच्या भेटीला रवाना झाले आहेत.
कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या तिजोरीतील सोने चांदी वितळवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. तुळजाभवानी चरणी भक्तांनी 2009 पासून 2023 पर्यंत 207 किलो सोने आणि 2 हजार 570 किलो चांदी अर्पण केली आहे. हे सर्व सोने आणि चांदी आता वितळवले जाणार आहे. यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती शिर्डी देवस्थानच्या भेटीला रवाना झाली आहे. ही समिती शिर्डी देवस्थानच्या संस्थेला भेट देवून अभ्यास करणार आहे. त्यानंतर सोने आणि चांदी वितळवण्याबाबत नियमावली तयार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तब्बल 14 वर्षानंतर देवीच्या तिजोरील सोने मोजण्यात आले होते. त्यानंतर ते वितळवले जाणार आहे. सोने, चांदी, दागिने वितळवण्यास विधी आणि न्याय विभागाने मंजुरी दिल्यानंतर मंदीर संस्थानने प्रक्रियेला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थांनाचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही समिती नेमली आहे. समितीचे काम सुरुदेखील झालं आहे.
भक्तांची देवाप्रती आस्था असते. भक्त खूप मनोभावे देवाची पूजा आणि प्रार्थना करतात. आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून भक्त देवाकडे साकडं घालतात. ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर भक्त खूप समाधानी आणि आनंदी होतात. त्या आनंदातून भक्त आपल्या देवाच्या चरणी सोनं किंवा चांदीचे दागिने अर्पण करतात. यामागे भक्तांची खूप शुद्ध भावना आणि भक्ती असते. दरवर्षी अनेक नामांकीत मंदिरांमध्ये हजारो कोटींचं सोनं-चांदी भक्तांकडून देवाच्या चरणी अर्पण केलं जातं. तुळजाभवानी आईच्या चरणीदेखील भक्त अशाचप्रकारे सोनं-चांदी अर्पण करतात.