नाशिकः ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दिवाळीत सत्ताधारी भाजपने 234 कोटींच्या रस्ते कामाचा नारळ फोडला आहे. त्यासाठी डिसेंबरमध्ये निविदा प्रक्रियेवर शिक्कामोर्तब होऊन कंत्राटदारांना काम सुरू करण्याचे आदेश दिले जाणार आहेत.
सत्ताधारी कुठलाही असो, निवडणुकीच्या तोंडावर जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचा प्रयत्न करणारच. नेमके तसेच नाशिकमध्ये होताना दिसत आहे. आयटी हबला मंजुरी, डबलडेकर उड्डाणपूल, लॉजिस्टिक पार्क ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या घोषणा. या साऱ्याचा भाजपला नक्कीच थोडाफार तरी निवडणुकीत फायदा होईल. आता रस्ते कामाला मंजुरी दिल्याने त्यात भरच पडली आहे. शहरातील सर्व प्रभागामध्ये 120 कोटींचे रस्ते केले जाणार आहेत. सोबतच 114 कोटींच्या रस्ते काँक्रिटीकरणासाठीही महापालिकेने निविदा काढल्या आहेत. या कामामध्ये पंचवटी विभागामध्ये 92 कोटींची कामे केली जाणार आहेत. त्यात स्टेडियम, उद्यान, ई-लर्निंग सेंटरसाठी 35 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. हा स्थायी समिती सभापती गणेश गिते यांचा प्रभाग आहे. त्यामुळे झुकते माप मिळाल्याची चर्चा आहे.
प्रभार रचनेचे काम वेगात
नाशिकमध्ये सुरुवातीला म्हणजे 26 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभागरचनेसाठी कच्चा आराखड्याचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय प्रभागरचना झाली. त्यानुसार या कामात पुन्हा बदल झाला. मात्र, आता नगरसेवकांची संख्याही 122 वरून 133 वर नेण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा या कामात बदल करावा लागणार आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार साधरणतः 36 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग होता. मात्र, नगरसेवकांची संख्या वाढल्यानंतर आता एका प्रभागाची लोकसंख्या 28 ते 30 हजारांच्या घरात असेल. त्यामुळे कच्च्या प्रभारचनेचे काम पुन्हा करावे लागेल. नाशिक, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर महापालिकेसाठी 30 नोव्हेंबरची मुदत होती. नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूरसाठी 18 नोव्हेंबर, तर लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगावसाठी 25 डिसेंबरची मुदत आहे. पनवेल, मीरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी हे काम 15 फेब्रुवारीपर्यंत करावे लागेल.
महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल
भाजप 67
शिवसेना 34
काँग्रेस 6
राष्ट्रवादी 6
मनसे 5
इतर 3
सध्याचे प्रभाग
29 प्रभाग 4 सदस्यीय
2 प्रभाग 3 सदस्यीय
असे असतील नवे प्रभाग
43 प्रभाग 3 सदस्यीय
1 प्रभाग 4 सदस्यीय
(234 crore road work started by ruling BJP in Nashik ahead of municipal elections)
इतर बातम्याः
22 हजार कोटींच्या विमान प्रकल्पासाठी भुजबळांच्या पायघड्या; नाशिकमध्ये येण्याचे टाटांना आवतन!
Special Report: तुझं हसणं माझ्या जगण्याची भाकरीय; जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या एका मुलखावेगळ्या कवीची गोष्ट!https://t.co/rIFR65qDOq#SpecialReport|#PabloNeruda|#Poet|#RevolutionaryPoet|#Chile
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2021