सहकार महर्षी शंकरराव मोहीते पाटील बँकेत 27 कोटींचा घोटाळा; सहा जणांविरोधात तक्रार

| Updated on: Nov 10, 2021 | 8:48 AM

अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहीते पाटील सहकारी बँकेत 27 कोटी 6 लाख 19 हजार 814 रुपयांचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सहकार महर्षी शंकरराव मोहीते पाटील बँकेत 27 कोटींचा घोटाळा; सहा जणांविरोधात तक्रार
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

पंढरपूर – अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहीते पाटील सहकारी बँकेत 27 कोटी 6 लाख 19 हजार 814 रुपयांचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बॅंकेचे पुणे येथील‌ लेखा परिक्षक गोकुळ राठी यांनी सहा जणांविरोधात अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माजी मंत्री प्रतापसिंह मेहिते यांनी या बँकेची स्थापना केली आहे. बँकेत घोटाळा झाल्याची बातमी समोर आल्याने  खबळळ उडाली आहे.

असा झाला घोटाळा 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  3 एप्रिल 2021 ते 20 आॕक्टोंबर 2021 या कालावधीत अकलूज येथील मुख्य शाखेचे व्यवस्थापक नितीन उघडे यांनी 24 कोटी 18 लाख 21 हजार 814 रुपये, टेंभुर्णी शाखेचे व्यवस्थापक रविंद्र पाताळे यांनी 53 लाख 84 हजार रुपये, करमाळा शाखेचे व्यवस्थापक समिर दोशी यांनी 1 कोटी 40 लाख 84 हजार 161 रुपये, सोलापूर शाखेचे व्यवस्थापक प्रदीप उघडे यांनी 53 लाख 34 हजार रुपये, इंदापूर शाखेचे व्यवस्थापक सचिन सावंत यांनी 6 लाख 50 हजार रुपये आणि कोथरुड शाखेचे व्यवस्थापक राहुल भिंगारदीवे  यांनी 33 लाख 45 हजार 800 रुपये या सर्वांनी मिळून एकूण 27 कोटी 6 लाख 19 हजार 814 रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी या सहाही जणांविरोधात लेखा परिक्षक गोकुळ राठी यांनी अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ठेविदारांमध्ये चिंतेचे वातावरण

दरम्यान बँकेत घोटाळा झाल्याचे समोर आल्याने ठेविदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ठेविदारांनी बँकेत गर्दी केली आहे. या बँकेमध्ये अनेक नागरिंकाच्या ठेवी आहेत. आयुष्यभर कष्ट करून केलेली पैशांची बचत सुरक्षीत राहील का? आपल्याला पैसे पतर मिळतील का असे अंसख्य प्रश्न सध्या ठेविदारांच्या मनात निर्माण झाले आहेत.

संबंधित बातम्या 

तुला पैसे प्रिय का प्रेयसी? त्याच्या ओठांना लावला विषाचा प्याला, भर दिवाळीत प्रियकर बेशुद्ध, काय घडलं जालन्यात?

मुंबई-नाशिक महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; 24 तासांत 5 ठार, दोन दुचाकीच्या टक्करमध्ये आज एक जण गतप्राण

नगर दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पार्थ पवारांचे ‘सूचक’ ट्वीट