नाशिक जिल्ह्यात 397 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; निफाडमध्ये 84 तर सिन्नरमध्ये 45 जण बाधित

| Updated on: Nov 16, 2021 | 3:31 PM

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.17 टक्के, नाशिक शहरात 98.22 टक्के, मालेगावमध्ये 97.12 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.62 टक्के आहे.

नाशिक जिल्ह्यात 397 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; निफाडमध्ये 84 तर सिन्नरमध्ये 45 जण बाधित
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्ह्यात 397 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात निफाडमध्ये 84 तर सिन्नरमध्ये 45 जण बाधित आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 2 हजार 530 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये तीनने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 692 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

असे आहेत जिल्ह्यातील रुग्ण

उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 38, बागलाण 05, चांदवड 12, देवळा 09, दिंडोरी 02, इगतपुरी 02, कळवण 03, मालेगाव 05, नांदगाव 04, निफाड 84, सिन्नर 45, सुरगाणा 01, त्र्यंबकेश्वर 01, येवला 20 असे एकूण 231 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 142, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 08 तर जिल्ह्याबाहेरील 16 रुग्ण असून, असे एकूण 397 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 11 हजार 619 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 02, बागलाण 01, चांदवड 03, दिंडोरी 01, इगतपुरी, नांदगाव 01, निफाड 05, सिन्नर 04, सुरगाणा 01, येवला 04 असे एकूण 22 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.17 टक्के, नाशिक शहरात 98.22 टक्के, मालेगावमध्ये 97.12 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.62 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.79 इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये 4 हजार 208 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 692 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवासांपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरणाने वेग घेतला आहे. विभागात राज्यात सर्वाधिक जास्त लसीकरण झाले आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत झपाट्याने घट होताना दिसत आहे.

नाशिक जिल्ह्यात 397 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात निफाडमध्ये 84 तर सिन्नरमध्ये 45 जण बाधित आहेत. जिल्ह्यातील 4 लाख 2 हजार 530 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये तीनने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 692 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
– डॉ. अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी

इतर बातम्याः

बहुचर्चित आमदार-मंत्री वादावर तूर्तास पडदा, कांदे म्हणतात समाधान, 90 टक्के निधी आत्ताच मिळाल्याचा भुजबळांचा दावा

साई भक्तांना शिर्डीत ऑनलाइन पासची सक्ती, 10 वर्षांखालील मुलांना दर्शन मनाई, भाविकांमध्ये रोष!

Pawar’s friendship: शरदाच्या दारात तारुण्याचे सदाबहार तोरण, हिरव्यागार दोस्तांचा बहारदार मळा अन् फुलांचे गाव!