Nashik| जिल्ह्यात 457 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; निफाडमध्ये 85, सिन्नरमध्ये 81

| Updated on: Nov 27, 2021 | 2:46 PM

जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे नाशिकरांच्या ह्रदयाचा ठोका पुन्हा एकदा चुकला आहे.

Nashik| जिल्ह्यात 457 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; निफाडमध्ये 85, सिन्नरमध्ये 81
सांकेतिक फोटो
Follow us on

नाशिकः जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे नाशिकरांच्या ह्रदयाचा ठोका पुन्हा एकदा चुकला आहे. कारण नाशिकमध्ये अजूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. सध्या 457 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 3 हजार 17 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत रुग्णांमध्ये 6 ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 718 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजचे रुग्ण

उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 39, बागलाण 2, चांदवड 18, देवळा 2, दिंडोरी 21, इगतपुरी 10, कळवण 2, मालेगाव 1, निफाड 85, सिन्नर 81, सुरगाणा 1, त्र्यंबकेश्वर 2, येवला 20 अशा एकूण 284 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 152, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 7 तर जिल्ह्याबाहेरील 14 रुग्ण असून, असे एकूण 457 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 12 हजार 192 रुग्ण आढळून आले आहेत.

आतापर्यंतचे मृत्यू

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.14 टक्के, नाशिक शहरात 98.21 टक्के, मालेगावमध्ये 97.12 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.77 इतके आहे. नाशिक ग्रामीण भागाच 4 हजार 226, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 8, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 718 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संमेलनापूर्वीच रुग्ण

नाशिकमध्ये येत्या 3 डिसेंबरपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनासाठी राज्य भरातून रसिक येणार आहेत. हजारो लोकांची येथे गर्दी होईल. दरम्यान, याच काळात परदेशात अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. सध्या रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी या देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाचा फैलाव वेगाने होत आहे. या देशांमध्ये करोनाचा नवा व्हेरीयंट आढळल्यास त्यावर देखरेख ठेवणे गरजेचे आहे. आपल्याइकडे केरळमध्येही झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. ते पाहता सध्या नियोजित असलेले संमेलन धोक्याची घंटा ठरू नये म्हणजे झाले. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून सर्वांनी नियमांचे पालन करावे. मास्क वापरावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


इतर बातम्याः

पाणीपुरवठा बंद असल्याने आज नाशिककरांची निर्जळी; उद्याही कमी दाबाने पाणी, जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू

साहित्य संमेलनाचा यथासांग राजकीय कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांच्या हजेरीसह नेते आणि मंत्र्यांची फळीच व्यासपीठ गाजवणार

Photo: क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा 12 फुटी भव्य पुतळा!