नाशिकः नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अजून वाढत असून, आता 488 जणांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती सोमवारी जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 2 हजार 753 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 704 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहितीही देण्यात आली.
आजचे पॉझिटिव्ह रुग्ण
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 32, बागलाण 5, चांदवड 23, देवळा 3, दिंडोरी 7, इगतपुरी 9, मालेगाव 4, नांदगाव 1, निफाड 74, सिन्नर 87, सुरगाणा 2, त्र्यंबकेश्वर 3, येवला 11 अशा एकूण 261 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 198, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 10 तर जिल्ह्याबाहेरील 19 रुग्ण असून, असे एकूण 488 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 11 हजार 946 रुग्ण आढळून आले आहेत.
कालचे पॉझिटिव्ह रुग्ण
नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 1, चांदवड 3, इगतपुरी 2, निफाड 9, सिन्नर 2, येवला 1 असे एकूण 18 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.16 टक्के, नाशिक शहरात 98.18 टक्के, मालेगावमध्ये 97.10 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.58 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.77 टक्के इतके आहे. नाशिक ग्रामीण 4 हजार 217 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 3, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 704 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आता भीती याची?
कोरोना लसीकरण वेगाने वाढत आहे. नाशिक जिल्हा आणि विभागही राज्यात अग्रक्रमावर आहे. मात्र, कोरोना रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. विशेषतः पाश्चिमात्य देशात अनेक ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात येत आहे. आता सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. त्यात नाशिकमध्ये डिसेंबर महिन्यात साहित्य संमेलन आहे. त्यासाठी राज्यभरातील रसिक येणार. हे पाहता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढू नये म्हणजे झाले. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत. प्रत्येकाने मास्क जरूर वापरावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Nashik: साहित्य संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक विश्वास पाटील, गीतकार जावेद अख्तर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारhttps://t.co/uuaiLJG8bv#Nashik|#SahityaSammelan|#ChiefMinisterUddhavThackeray|#GuardianMinisterChhaganBhujbal|#NovelistVishwasPatil|#LyricistJavedAkhtar
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 21, 2021
इतर बातम्याः
बाब्बो, एकट्या जळगावात 3518 कोटींच्या वीजबिल थकबाकीचा डोंगर; महावितरणचे कंबरडे मोडले!