७ मुलींची जन्मदात्याला जणू साताजन्माची माया, वडिलांना वयाच्या ९५ व्या वर्षी ही केवढी मोठी साथ

| Updated on: Jan 30, 2023 | 1:07 PM

मुलगाच हवा असा आग्रह धरणाऱ्या पालकांनी या मुलींनी काय करुन दाखवले, ते वाचा.

७ मुलींची जन्मदात्याला जणू साताजन्माची माया, वडिलांना वयाच्या ९५ व्या वर्षी ही केवढी मोठी साथ
सात मुलींनी साजरा केला वडिलांचा वाढदिवस
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

बीड : मुलगी झाली हो…म्हणून नाराज असणारे पालक अजूनही काही प्रमाणात आहे. परंतु समस्त मुलींच्या पालकांना आनंद देणारी बातमी बीडमधून आली आहे. मुली सासरी जाऊनही जन्मदात्यासाठी असलेलं आपलं कर्तव्य पुर्ण करतात. त्यांची काळजी घेतात. त्यांच्या प्रत्येक आनंदात सहभागी होतात. हे सिद्ध करुन दाखवलंय. सात जन्माची माया लावणाऱ्या मुली असल्या म्हणजे जन्मदात्यांनाही मुलगा नसल्याची जाणीव कधीच होत नाही.

मुलींमुळे चेहऱ्यावर हास्य

बीडच्या आष्टी तालुक्यातील किन्ही गावात वास्तव्यास असलेल्या लक्ष्मण काकडे. वय वर्ष 95. त्यांना सात मुली आहेत. सर्वांची लग्न झाली आहे. सासरी जाऊनही मुली आपल्या वडिलांची काळजी घेताय. त्यांच्या प्रत्येक सुखात अन् दु:खातही बरोबरीची साथ देताय. त्यामुळे 95 व्या वर्षीय लक्ष्मण काकडे यांना कधी मुलगा नसल्याची जाणीव झाली नाही. आता मुलींनी जे केले, त्यानंतर त्यांचा आनंद चेहऱ्यावरुन ओसंडून वाहू लागला.

हे सुद्धा वाचा

वाढदिवस केला साजरा

लक्ष्मण काकडे यांचा 95 वाढदिवस होता. सात मुलींनी आपल्या लाडक्या बाबांचा वाढदिवस जोरदार साजरा करण्याचा निर्णय घेतला. गावातील प्रतिष्ठीत आणि नातेवाईकांना निमंत्रण दिले गेलं. मुलींच्या या प्रेमाच्या आग्रहामुळे नातेवाईक व काकडे मित्र परिवार जमा झाला. सर्वांनी मिळून वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. त्याची चर्चा परिसरात चांगलीच सुरु आहे.

पोलीस दलातून निवृत्ती

लक्ष्मण काकडे पोलीस दलात होते. त्यांनी पोलीस दलात 30 वर्षे सेवा केली. आता त्यांना सेवानिवृत्त होऊन तब्बल 42 वर्षे झाली आहेत. त्यांना मुलगा नाही मात्र कुटुंबात सात मुली असल्याने ते आनंदी आहेत. सात मुलींनी त्यांना सात जन्माची माया लावलीय. आतापर्यंत सासरी राहूनही मुलींनी आई-वडिलांची सर्व हौस पूर्ण केलीय. यामुळे वंशाच्या दिव्याचा अट्टाहास कशासाठी? असे नेहमी ते म्हणत असतात.