ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर आजी खूश, केला भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल

| Updated on: Dec 20, 2022 | 11:54 PM

राज्यातील जवळपास साडेसात ग्रामपंचायतींचा निकाल आज समोर आलाय. या निकालात भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर आजी खूश, केला भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल
Follow us on

परभणी : राज्यातील जवळपास साडेसात ग्रामपंचायतींचा निकाल आज समोर आलाय. या निकालात भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय. भाजपला सर्वाधिक जागांवर यश मिळालंय. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर राज्यभरात विजयी उमेदवारांच्या पॅनलकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून जोरदार गुलालाची उधळण करण्यात आली. विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ आतापर्यंत समोर आले आहेत. यापैकी एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओत एक आजीबाई भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्हिडीओ हा परभणी जिल्ह्यातील आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यात पांढरा ढोणे इथला हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत नृत्य करणाऱ्या आजीबाईंचं नाव रुक्मिणीबाई ढोणे असं आहे.

हे सुद्धा वाचा

पांढरा ढोणे येथे महाविकास आघाडीच्या पॅनलचा विजय झाला. इथे 9 पैकी 7 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झालाय. यावेळी विजयी उमेदावार आणि त्यांच्या समर्थकांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला.

या जल्लोषात 70 वर्षीय आजी रुक्मिणीबाई ढोणे या देखील सहभागी झाल्या. त्यांनी गळ्यात पुष्पहार घालून ढोल-ताशांच्या तालावर भन्नाट डान्स केला. त्यांचा डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधत आहे.

इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई सरपंच

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गज मंडळींच्या नातेवाईकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या सासू सरपंच झाल्या आहेत. संगमनेरमधल्या निळवंडे गावच्या निवडणुकीत इंदोरीकरांच्या सासू शशिकला पवार जिंकल्या आहेत.

कोणत्याही पक्षाकडून उभं न राहता सरपंचपदाच्या जागेसाठी त्या अपक्ष उभ्या होत्या. मात्र निळवंडेंच्या ग्रामस्थांनी शशिकला पवारांवर विश्वास दाखवलाय. प्रतिस्पर्धी उमेदवार सुशीला उत्तम पवारांचा त्यांनी पराभव केला. अपक्ष म्हणून नारळ हे त्यांचं चिन्ह होतं. विजय मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी भाजपला पाठिंबा देणार असल्याचं म्हटलंय.