मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यासाठी 72 तास…. हवामान विभागाचा अलर्ट
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरात आज दिवसभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात परतीच्या पावसाचा प्रवास सुरु आहे. मागील आठडाभरापासून मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यातच आता – पुढील 72 तासात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ अनुपम कश्यपी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मराठवाडा, विदर्भ या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरात आज दिवसभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात पुढील 72 तासात पावसाचा अंदाज आहे. मात्र, राज्यातील उत्तर महाराष्ट्रातून परतीचा पाऊस जाणार असल्याचाही पुणे हवामान विभागाचा अंदाज आहे.
Published on: Oct 10, 2022 06:44 PM
Latest Videos