नाशिकः नाशिक महापालिकेने कोरोनाकाळात सेवा बजावणाऱ्या 983 कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले नाही. त्यामुळे येणाऱ्या महासभेत हा मुद्दा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
नाशिक महापालिकेत जवळपास पाच हजार कर्मचारी आहेत. त्यांना जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपयांचा बोनस मिळावा अशी मागणी साऱ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. मात्र, एकीकडे आधीच महापालिका आर्थिक संकटात आहे. ते पाहता या कर्मचाऱ्यांना पंधरा हजारांचा सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली. महापालिका आस्थापनेवरील गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांत अंगणवाडी सेविका, मदतनीस, सफाई कामगार यांना हे सानुग्रह अनुदान मिळाले. गट ‘क’ मधील सातव्या वेतन आयोगाच्या लेव्हल – 15 आणि त्यापेक्षा कमी वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळाला. सोबतच ज्या कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतनमधील बँडमधील वेतनश्रेणी ही 9300-34,800 व ग्रेड पे 4400 रुपयांपेक्षा कमी वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हे अनुदान मिळाले. गेल्या वर्षीच्या दिवाळीनंतर मानधनावर कार्यरत असणारे अंगणवाडी कर्मचारी, मानधनावर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ कार्यरत असणारे कर्मचारी यांनाही सानुग्रह अनुदान मिळाले. त्यात कोरोनाकाळात जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना साडेसात हजार रुपये मानधन आणि शासन अनुदानातून मानधन वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही साडेसात हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळाले.
राजकीय वातावरण पेटणार
नाशिक महापालिकेत कोरोनाकाळात सेवा बजावणाऱ्या 983 कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिला. आता हा मुद्दा येणाऱ्या महासभेत गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत कोणीही बोलत नाही. इतर वेळी करोडो रुपयांच्या विषयांना तात्काळ मंजुरी देणारी महासभा यंदा मात्र चूप का आहे, असा संतप्त सवाल या कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. येणाऱ्या काळात विरोधक या विषयावरून वातावरण पेटवण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात नाशिक महापालिकेची निवडणूक आहे. त्याच्या तोंडावर विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे. त्यामुळे यावरून येत्या महासभेत जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (983 employees serving during the Corona period do not receive a sanagraha grant; The issue will be raised in the general body meeting of Nashik Municipal Corporation)
इतर बातम्याः
नाशिक महापालिका निवडणूकः 3 दिवसांत कच्ची प्रभाग रचना होणार अंतिम
निकाळजे म्हणतात, आमदारांवर गुन्हा दाखल करा; भुजबळ-कांदे वादाला नवे वळण
Special Report: स्वातंत्र्याचं बेफाम वारं, अनंतराव नावाचा झंझावात अन् महाराष्ट्रातलं ‘मॅन्चेस्टर गार्डियन’https://t.co/mThHQYOyX6#Marathwada|#HyderabadMuktisangram|#FreedomFighterAnantraoBhalerao|#Aurangabad|#Maharashtra|#Razakar
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2021