अमरावती : अमरावतीमध्ये भीषण इमारत दुर्घटना घडली आहे. इमारत कोसळून पाच जण ठार झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाळी आणखी लोक अकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरीकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अथक परिश्रम घेत आहेत. इमारत कोसळण्यामागचे नेमकं कारण अद्याप समोर आले नसले तरी इमारत जुनी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अमरावतीच्या प्रभाग चौकात ही इमारत दुर्घटना घडली आहे. ही दुर्घटनाग्रस्त इमारत दोन मजली आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावर राजेंद्र लॉज आहे. तर, खालच्या मजल्यावर राजदीप बॅगचे दुकान आहे.
दुपारी दोनच्या सुमारास बॅगचे दुकान कोसळले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनेकजण ढिगाऱ्या खाली गाडले गेले. पाच जणांचे मृतदेह अग्नीशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहेत. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
इमारत कोसळल्याचे समजताच येथे अडकेलेल्या लोकांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. अग्नीशमन दलाचे बचाव कार्य सुरु आहे.
किती जण ढिगाऱ्याखाली अडकले होते याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. अणरावतीच्या खासदार नवनीत राणा यादेखील घटनास्थळी दाखल झाल्या.