युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्या निशाण्यावर शिंदे गटाचे नेते आहेत. पण आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ज्युनिअर ठाकरे विरोधात ज्युनिअर शिंदे असं चित्र सध्या राज्याच्या राजकारणात दिसतंय. याबाबत सविस्तर वृत्त सांगणारा ‘टीव्ही 9 मराठी’चा स्पेशल रिपोर्ट!