राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्रातील निवडणूक रिंगणातून बाहेर, प्रचार मात्र करणार

| Updated on: Oct 26, 2024 | 4:15 PM

maharashtra assembly election 2024: ऑक्टोंबर महिन्यात हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुका झाल्या. यामधील हरियाणा हे राज्य अरविंद केजरीवाल यांची जन्मभूमी आहे. हिसार या जन्मभूमीतही अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या उमेदवाराची अमानत रक्कम जमा झाली.

राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्रातील निवडणूक रिंगणातून बाहेर, प्रचार मात्र करणार
maharashtra assembly election 2024
Follow us on

maharashtra assembly election 2024: महाराष्ट्रातील निवडणूक रणधुमाळीतून बड्या राष्ट्रीय पक्षाने माघार घेतली आहे. हरियाणा 89 जागावर निवडणूक लढणाऱ्या आम आदमी पार्टीला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. विशेष म्हणजे ‘आप’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचे हे राज्य आहे. त्याचवेळी जम्मू-काश्मीरमध्ये केवळ ‘आप’ला खाते उघडता आले आहे. यामुळे ‘आप’ने महाराष्ट्रात निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. आम आदमी पार्टी महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार नाही, अशी माहिती पक्षाचे नेते आणि खासदार संजय सिंग यांनी ही माहिती दिली. परंतु पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल प्रचार करणार आहे. ते महाविकास आघाडीच्या प्रचाराला येणार आहे.

या दोन राज्यांत अपयश

ऑक्टोंबर महिन्यात हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुका झाल्या. यामधील हरियाणा हे राज्य अरविंद केजरीवाल यांची जन्मभूमी आहे. हिसार या जन्मभूमीतही अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या उमेदवाराची अमानत रक्कम जमा झाली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार या राज्यात आम आदमी पक्षाला केवळ 1.53% मते मिळाली. तसेच जम्मूमध्ये एक जागा मिळाली. काश्मीरमध्ये काहीच यश मिळाले नाही. त्यानंतर महाराष्ट्रात काही जागा लढण्याची तयारी आम आदमी पक्षाने केली होती. पक्षाकडून विलेपार्ले अथवा मलबार हिल विधानसभा जागा लढण्याची शक्यता होती. मात्र त्या दोन्ही जागा ठाकरे गट लढणार आहे. यामुळे आम आदमी पार्टी निवडणूक रिंगणात उतरणार नाही.

हरियाणामधून घेतला धडा

हरियाणात काँग्रेससोबत आपने युती करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी युती झाली नाही. त्यामुळे राज्यातील 90 पैकी 89 जागा आपने लढवल्या. कारागृहातून बाहेर आल्यानंतर आप नेते अरविंद केजरीवाल यांनी प्रचारही केला. परंतु यश आले नाही. त्यापासून धडा घेत महाविकास आघाडी म्हणजेच इंडिया आघाडीत वाटा मिळत नसल्याने आपने निवडणूक रिंगणातून माघार घेतली.

हे सुद्धा वाचा

आपचे खासदार संजय सिंग यांनी निवडणूक न लढवण्याची माहिती X वर दिली. त्यानंतर सोशल मीडियावर त्यावर अनेक मजेशीर कॉमेंट सुरु झाल्या आहेत. अनेकांनी हरियाणा निवडणुकीचे उदाहरण देऊन आपचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.