लातूर : दिल्लीच्या आम आदमी पार्टी (आप) या पक्षाने आता महाराष्ट्रात खातं खोललं आहे. लातूर जिल्ह्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत आपचे सात पैकी पाच उमेदवार निवडून आले आहेत. आपचे महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या या ट्विटला उत्तर देत आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी मराठीत ट्विट केलं आहे (AAP candidates win in Latur gram panchayat lection 2021).
अजिंक्य शिंदे यांचं ट्विट
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत आपचे जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वात 7 पैकी 5 जागांवर आपच्या उमेदवारांना विजय मिळाला आहे. सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन, असं अजिंक्य शिंदे यांनी ट्विट केलं. या ट्विटला केजरीवाल यांनी मराठीत उत्तर दिलं.
अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?
“विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा”, असं ट्विट केजरीवाल यांनी केलं (AAP candidates win in Latur gram panchayat lection 2021).
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा. https://t.co/F89YnNX6ZQ
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 18, 2021
लातूरमध्ये भाजपला सर्वाधिक जागा
लातूर जिल्ह्यात भाजप सध्या सर्वाधिक जागांवर विजय ठरताना दिसत आहे. लातूरमध्ये भाजपने 93 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसला 63 जागांवर विजय मिळाला आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीला 23 तर शिवसेनेला 4 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला आहे.
हेही वाचा : नागपूर गडावर वर्चस्व राखण्यात काँग्रेसला मोठं यश, आतापर्यंत 53 ग्रामपंचायती खिशात