औरंगाबादः आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाण्याची ओढ असंख्य भाविकांना लागली आहे. मराठवाड्यातूनही (Marathwada) अनेक भाविक पंढरपूरच्या दर्शनासाठी जात असतात. या भाविकांसाठी पंढरपूरपर्यंत विशेष रेल्वे (Special train for Pandharpur) सोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. जालना, नांदेड आणि औरंगाबादहून पंढरपूर आणि परतीसाठी विशेष गाड्या चालवल्या जातील. ही विशेष सेवा 07 जुलैपासून सुरु केली जाईल, असे रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. औरंगाबाद, जालना, नांदेड या स्टेशनवरून निघाणाऱ्या गाड्यांमधून वारकरी आणि भक्तांनी योग्य वेळात पंढरपूरला पोहोचावेत, या दृष्टीने रेल्वे विभागाने काळजी घेण्यात आली आहे. मराठवाड्यातील तीन ठिकाणांहून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळा पुढीलप्रमाणे-
– 9 जुलै रोजी संध्याकाळी 7.20 वाजता विशेष गाडी (07468) निघेल. पंढरपूरला दुसऱ्या दिवशी ती सकाळी 6.30 वाजता पोहोचेल. हीच गाडी परतीच्या प्रवासाला 10 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता पंढरपूरवरून (07469) सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता जालन्याला पोहोचेल. या गाडीत एसी, सेकंड क्लास (स्लीपर), जनरल असे 13 डबे असतील.
– 9 जुलै रोजी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून विशेष गाडी (07515) रात्री 9.40 वाजता निघेल व दुसऱ्या दिवशी 11.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या दिशेने ही गाडी (07516) पंढरपूर स्टेशनवरून 10 जुलै रोजी रात्री 11 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 12.20 वाजता औरंगाबादला पोहोचेल. या गाडीत सेकंड क्लास (स्लीपर) जनरल असे 17 डबे असतील.
नांदेड रेल्वे स्टेशनवरून विशेष गाडी (07498) 9 जुलै रोजी दुपारी 3 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.35 वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या दिशेने ही गाडी (07499) पंढरपूर स्टेशनवरून 10 जुलै रोजी रात्री 9.21 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6.50 वाजता नांदेडला पोहोचेल. या गाडीत एसी, सेकंड क्लास (स्लीपर), जनरल असे 18 डबे असतील.
मागील दोन वर्ष कोरोना संकटामुळे पंढरपूर वारीमध्ये लाडूच्या प्रसादाची विक्री बंद होती. या वर्षी मोठ्या प्रमाणावर लाडू बनवण्यात येत आहेत. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते लाडू विक्रीचा प्रारंभ करण्यात आला. विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना अल्पदरात प्रसाद उपलब्ध व्हावा, यासाठी मंदिर समितीच्या वतीने लाडू प्रसाद विक्री केली जाते. नाशिक येथील यशोधरा महिला सहकारी औद्योगिक सहकारी संस्थेला लाडू प्रसाद तयार करण्याचे काम देण्यात आले आहे.