राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपने विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील 16 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे. आज विधानसभेसाठी इच्छूक असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांच्याकडून 16 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. त्यांची यादी आता समोर आली आहे.
यांना मिळाले एबी फॉर्म
1. संजय बनसोडे
2. चेतन तुपे
3. सुनील टिंगरे
4. दिलीप वळसे पाटील
5. दौलत दरोडा
6. राजेश पाटील
7. दत्तात्रय भरणे
8. आशुतोष काळे
9. हिरामण खोसकर
10. नरहरी झिरवळ
11. छगन भुजबळ
12. भरत गावित
13. बाबासाहेब पाटील
14. अतुल बेनके
15. नितीन पवार
16. इंद्रनील नाईक
17. बाळासाहेब आजबे
भाजपची यादी जाहीर
दरम्यान रविवारी भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये 99 जणांचा समावेश आहे. भाजपची पहिली यादी जाहीर होताच काही ठिकाणी ज्या इच्छूकांना तिकीट मिळालं नाही त्यांच्यामध्ये नाराजी दिसून आली. 99 जागांपैकी एकूण 13 मतदारसंघात भाजपकडून महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. भाजपनंतर आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात देखील हालचालींना वेग आला असून, दोन्ही पक्षांकडून कोणत्याही क्षणी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आतापर्यंत 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं आहे. ज्यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील दत्तात्रय भरणे संजय बनसोडे अशा दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.