मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या आरोपावर पलटवार करत थेट धमकी वजा इशारा दिला आहे. नारायण राणे यांनी संजय राऊत यांचा 26 डिसेंबरचा अग्रलेखाचे कात्रण काढून ठेवले, पुन्हा जेलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा करत आहे, संजय राऊत याला मी सोडणार नाही असं म्हणत संजय राऊत यांच्यावर भाजपचे खासदार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी थेट राणे यांना आव्हान दिले आहे. मला धमक्या देऊ नका आणि माझ्या नादाला लागू नका तुम्हाला महागात पडेल असेही राऊत यांनी म्हंटले आहे. याशिवाय तुमची प्रकरणे काढली तर तुम्ही पन्नास वर्षे जेलच्या बाहेर येणार नाहीत असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
नारायण राणे यांच्या आरोपवर संजय राऊत यांनी हल्लाबॉल करत असतांना म्हंटलय, तुम्ही न्यायालयापेक्षा मोठे झाला का ? धमक्यांना मी घाबरत नाही, राजवस्र बाहेर काढून या.
ईडीची नोटिस येताच आम्ही पक्ष बदलणारे नाही, तुमच्या सारखे आम्ही पळून गेलो नाही, पक्षासाठी आम्ही जेलमध्ये गेलो असेही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
मला बोलायला लावू नका, झाकली मूठ सव्वा लाखाची, कधीकाळी ते आमचे सहकारी होते त्यामुळे आम्ही बोललो नाही, मला बोलायला लावू नका.
नारायण राणे यांची सगळी वक्तव्य जस्टीस ऑफ इंडियाला पाठविली आहे, सगळे रेकॉर्ड मी पाठविले आहे एक दिवस तुम्हाला ते महागात पडेल.
तुमची सगळी आर्थिक प्रकरणे बाहेर काढली तर तुम्हाला पन्नास वर्षे जेलमध्ये राहावं लागेल असेही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
एकूणच राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यावर संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले असून येत्या काळात राणे विरुद्ध राऊत असा आणखी एक नवा सामना राजकीय वर्तुळात पाहायला मिळू शकतो.