मुंबई : सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी भाजपवर हल्लाबोल करत असतांना दुसऱ्याची घरं फोडण्याची परंपरा भाजपची आहे असं म्हंटलं होतं. नाशिकमध्ये सुधीर तांबे यांना कॉंग्रेसने एबी फॉर्म दिल्यानंतरही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता सत्यजित तांबे ( Satyajit Tambe ) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं कॉंग्रेसची मोठी अडचण झाली होती. त्यामध्ये कॉंग्रेसकडून हे सर्व खापर भाजपवर फोडण्यात आले होते. त्यावर कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी पुन्हा भाजप घरं फोडत असल्याचा आरोप केला आहे. त्यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी पटोले यांच्यावर पलटवार केला आहे.
सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होऊ लागल्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हल्लाबोल केला आहे, भाजप घरं फोडत असल्याचा आरोप पटोले यांनी पुन्हा एकदा केला आहे.
सत्यजित तांबे हे 04 फेब्रुवारीला आपली भूमिका जाहीर करणार आहे. त्यामध्ये सत्यजित तांबे यांना विविध नेते सल्ला देत असतांना पटोले यांनी बोलणं टाळलं आहे.
सत्यजित तांबे यांनी विजय झाल्यानंतर भूमिका मांडण्याची तयारी दर्शवली आहे. त्यावर नाना पटोले यांनी टीका केली आहे, सुरुवातीपासून भूमिका मांडा असे आम्ही म्हणत असल्याचे पटोले यांनी म्हंटलं आहे.
सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. वडीलही 13 वर्षे आमदार होते, त्यामुळे कॉंग्रेसशी अनेक वर्षांपासून जोडलेले तांबे कुटुंब आहे. त्याच घरातील सत्यजित तांबे आहेत.
सत्यजित तांबे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी भाजपकडून खुली ऑफर दिली जात आहे. त्यात तांबे यानं स्थानिक पातळीवर सत्यजित तांबे यांनाही भाजपने मदत केली आहे.
सत्यजित तांबे यांचा विजय होण्याआधीच भाजपच्या नेत्यांनी सत्यजित तांबे यांचाच विजय होणार असल्याचे म्हंटले आहे, त्यामुळे कॉंग्रेसने हाच मुद्दा हेरून भाजप घरं फोडत असल्याचा आरोप केला आहे.
तर नाना पटोले यांनी केलेल्या आरोपवर चंद्रकांत पाटील यांनी घरं फोडण्याची परंपरा ही भाजपची नसून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची असल्याचे म्हंटले आहे. ही सुरवात कॉंग्रेसने आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुरू केल्याचे पाटील यांनी दावा केला आहे.
राज्याच्या राजकारणात घरं फोडण्याचा मुद्दा चर्चेत आला असून राजकीय आखाड्यात कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली असून त्यात भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही त्यामध्ये ओढून घेतले आहे.