सयाजी शिंदेंना सत्तेआधीच मंत्रिपदाचे वेध, मागितलं हे खातं

| Updated on: Oct 25, 2024 | 6:35 PM

काही दिवसांपूर्वीच अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राजकारणात प्रवेश करताच सयाजी शिंदे यांना मंत्रिपदाचे वेध लागल्याचं पाहायला मिळत आहे.

सयाजी शिंदेंना सत्तेआधीच मंत्रिपदाचे वेध, मागितलं हे खातं
सयाजी शिंदे
Follow us on

काही दिवसांपूर्वीच अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राजकारणात प्रवेश करताच सयाजी शिंदे यांना मंत्रिपदाचे वेध लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी  आपल्याला वन खातं मिळावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. मला वन खातं मिळालं तर उत्तमच असं सयाजी शिंदे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले सयाजी शिंदे? 

अभिनय क्षेत्र, समाजकारण आणि राजकारण एकमेकांचे दुष्मण नसून एकमेकांना पुरक आहे. मला जे उदिष्ट साध्य करायचंय त्यासाठी मी राजकारणात आलो असून, युती सरकार पुन्हा सत्तेवर येणार असून मला वनखातं दिलं तर उत्तमच असल्याचं अभिनेते सयाजी शिंदे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचा विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी हजेरी लावली. मोठ्या उत्साहाने निघालेल्या रॅलीत सयाजी शिंदे यांना लोकांनी खांद्यावर उचलून घेतले होते. समाजकारण, अभिनयक्षेत्र आणि राजकारण हे एकमेकांचे दुष्मन नाही तर एकमेकांना पूरक आहेत. राज्यात पुन्हा युतीचं सरकार येणार असून, माझं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मला वनखातं दिलं तर उत्तमच असल्याचं सयाजी शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान अनेक दशकांनंतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच काळे आणि कोल्हे यांची थेट लढाई होणार नसून, कोल्हेंनी भाजपातच राहण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र आज युतीच्या उमेदवाराचा अर्ज भरताना त्या उपस्थित नसल्याचं बघायला मिळालं. यावर प्रतिक्रिया देताना त्यांना यायचं कि नाही हा त्यांचा अधिकार असून समोर उमेदवार कोणीही असला तरीही निवडणूक हलक्यात न घेता निवडणूक लढवणार आणि विजयी होणार असा विश्वास आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केलाय.

कार्यकर्त्यांचा गोंधळ 

कोपरगाव विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजीत पवार गटाकडून आशुतोष काळे यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. मात्र उमेदवारी अर्ज भरताना काही अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे गोंंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना शांत केलं.