मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारत आधी सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी गाठली आहे. शिंदे यांच्याबरोबर सुमारे 35 भर आमदार असल्याचे म्हटलं जात आहे. तर शिवसेनेविरोधात बंड केल्याने शिंदे यांची गटनेतेपदावरून हाकालपट्टी करण्यात आली आहे. तर शिंदेंसह बंडखोर झालेले शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तर जर जे उरलेले आमदार आहेत आणि जे बंडखोरी केलेले आहेत त्यांच्याशीही शिवसेनेकडून बोलले जात आहे. यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे कामाला लागले आहेत. ते स्वत: आपल्या आमदारांशी बोलत आहेत. तर जे नॉटरिचेबल आमदार आहेत त्यांच्यापर्यंत देखील पोहोचण्याचे प्रयत्न केले जात आहेत. चदरम्यान आदित्य ठाकरे यांनी संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्यात फोनवरून संवाद साधल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना आता उशीर झाल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडी सरकारला आता थांबण्याची वेळ आली असून राज्यात भाजपप्रणित ऑपरेशन लोटस हे पुर्णत्वाकडे जात आहे. शिवसेनेचे गटनेते असलेले शिंदे यांनीच बंडखोरी करत शिवसेनेची डोके दुखी वाढवली आहे. तर यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकार देखील संकटात सापडले आहे. तर शिंदे यांनी आपल्यासोबत 35 भर आमदार नेल्याने महाविकास आघाडी सरकारच आता अल्प मतात आले आहे. त्यामुळे हे सरकार पडणार की काय अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपले लक्ष आता आमदारांच्या मनधरणीकडे दिले आहे. त्यांनी जे आमदार बाहेर पडलेले नाहीत त्यांच्याशी आणि जे नॉट रिचेबल आमादार आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. तर ज्यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्याशीही बोलणं सुरू ठेवलं आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आमदार संतोष बांगर आणि अजय चौधरी यांच्याकडून आमदारांना संपर्क साधायला सुरुवात केली असल्याची माहिती समोर येत आहे.
तर आदित्य ठाकरे यांनी संतोष बांगर यांच्यात फोनवरून संवाद साधल्याची माहिती मिळत आहे. तसेच सध्या बंडखोर आमदारांच्या खेम्यात काय होत आहे आणि राज्या त कोणत्या घडामोडी घडत आहेत याकडेही आदित्य ठाकरे लक्ष देऊन आहेत. ते फोनवरून प्रत्येक घडामोडीची माहिती घेत आहेत. तसेच हॉटेल रेगिसमध्ये हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान आदित्य ठाकरे यांनी यांच्याकडे असणारे पर्यावरण मंत्रीपदाचा उल्लेख हा यांच्या ट्विटरवरून काढलं आहे. त्यावरूनही आता राज्यातील हे सरकार राहणार की पडणार असे ही तर्क लावले जात आहेत.