अकोला : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील आठवड्यात राज्यातील सरकार कोसळून मध्यवर्ती निवडणुका लागतील यासाठी तयार रहा असं आवाहन केलं होतं, त्यानंतर अकोला दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असतांना मध्यवर्ती निवडणुकीबाबत मोठं विधान केले आहे. आदित्य ठाकरे अकोला येथील सभेत बोलत असतांना त्यांनी राज्यातील सरकार घटनाबाह्य असून ते सरकार काही महिन्यात कोसळणार असून लवकरच निवडणुका लागणार आहे असा दावा करत तुम्ही तयार आहात ना ? अशी हाक उपस्थित कार्यकर्त्यांना दिली होती. अकोला दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिंदे गटातून परत आलेले आमदार नितीन देशमुख यांचे कौतुक करत शिंदे गटावर जहरी टीका केली आहे.
जवळपास राज्यात सत्तांतर होऊन चार महीने झाले आहेत, ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे राज्यभर दौरे करत असून चाळीस आमदार यांच्यासह सरकारवर हल्ला बोल करत आहे.
राज्यातील सरकार काही महिन्यांत कोसळणार असून लवकरच निवडणुका लागणार असल्याचे भाकीत आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी केलेलं हे भाकीत करत असतांना उपस्थित कार्यकर्ते यांना तुम्ही तयार राहा अशी साद घालत वातावरण निर्मिती केली आहे.
शेतकरी प्रश्नांवर आम्ही ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत आहोत, मात्र त्याला सरकार काहीच उत्तर देत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी सभेत बोलत असतांना सूरत, गुवाहाटी आणि नंतर गोव्या मार्गे परत आलेले चाळीस आमदार गद्दार असून सरकार देखील गद्दार असल्याचं म्हंटलं आहे.
याशिवाय आम्ही कोणाच्याही डोळ्यात डोळे घालून बघू शकतो, तसे ते चाळीस आमदार बघू शकत नाही. हे सरकार खोके सरकार आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले आहे.