राहुल शेवाळे यांचं लग्न ठाकरे घराण्यानं कसं वाचवलं हे मला माहित, आदित्य ठाकरे यांचा पलटवार

| Updated on: Dec 21, 2022 | 8:45 PM

राहुल शेवाळे यांनी आज लोकसभेत बोलताना आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यावर आदित्य ठाकरे यांनी ही खोचक टीका केलीये.

राहुल शेवाळे यांचं लग्न ठाकरे घराण्यानं कसं वाचवलं हे मला माहित, आदित्य ठाकरे यांचा पलटवार
Follow us on

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन ( Sushant Singh Rajput ) शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे ( Rahul Shewale ) यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल होते. सुशांतच्या मृत्यू आधी रिया चक्रवर्तीच्या फोनवर AU नावाने 44 कॉल आले होते. त्यातील AU कोण आहे?, अनन्या उद्धव की आदित्य उद्धव?, असा सवाल उपस्थित करत केंद्रीय गृहमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी केली होती. यावर ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी टीका केली होती. राहुल शेवाळे यांचं डोकं फिरल्याची टीका त्यांनी केली होती.

आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांनी देखील या आरोपावर उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, गद्दारी करणाऱ्यांकडून चांगलं काही अपेक्षित नाही. मला त्या घाणीत जायचं नाही. शेवाळेंचं लग्न ठाकरेंनी कसं वाचवलं मला माहित असल्याची टीका देखील आदित्य ठाकरे यांनी राहुल शेवाळे यांच्यावर केली आहे.

राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवरुन लक्ष हटवण्यासाठी असे आरोप केले जात असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. सभागृहात आम्हाला बोलू दिलं जात नाहीये. राज्यातील प्रश्न बाजुला राहिलेत. राज्यपालांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.