अरविंद सावंतांंनंतर आता ठाकरे गटाचा उमेदवार अडचणीत, ते प्रकरण भोवणार?

| Updated on: Nov 04, 2024 | 3:54 PM

अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यानंतर आता ठाकरे गटाचा आणखी एक नेता आडचणीत आला आहे.

अरविंद सावंतांंनंतर आता ठाकरे गटाचा उमेदवार अडचणीत, ते प्रकरण भोवणार?
Image Credit source: ANI
Follow us on

मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून राजकारण चांगलंच तापलं. सावंत यांच्या विधानावरून सत्ताधाऱ्यांनी ठाकरे गटाची जोरदार कोंडी केली. मात्र त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊत अडचणीत आले आहेत. सुनील राऊत यांनी महायुतीच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी राऊत यांच्याविरोधात महायुतीच्या वतीनं विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

विक्रोळी विधानसभा  मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाविरुद्ध शिवसेना शिंदे गट  अशी लढत आहे. या मतदारसंघातून शिवसेनेकडून सुवर्णा करंजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र सुनील राऊत यांनी सुवर्णा करंजे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात आला आहे.  सुवर्णा करंजे यांच्याबाबत करण्यात आलेल्या विधानाचा निषेध महायुतीकडून करण्यात आता. तसेच याप्रकरणी  सुनील राऊत यांच्याविरोधात  भाजप आणि शिवसेनेच्या वतीनं तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सुनील राऊत यांना त्यांचा पराभव दिसत असल्यामुळे अशाप्रकारे महिलांबाबत वक्तव्य करण्याचे काम त्यांनी केलेल आहे. राऊत यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा देखील यावेळी महिला आघाडीच्या वतीने देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सुनील राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे काही दिवसांपूर्वी अरविंद सावंत यांनी देखील शायना एनसी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणावर त्यांनी दिलीगिरी व्यक्त करताना माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्यांचं म्हटलं. तर या प्रकरणात शिवसेना ठाकरे गाटाचे नेते संजय राऊत यांनी देखील उडी घेतल्याचं पाहायला मिळालं. अरविंद सावंत यांच्या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झाला नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. यावरून शायन एनसी यांनी संजय राऊतांवर देखील जोरदार हल्लाबोल केला होता.