कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत (Kolhapur North Election Result) काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (jayshree jadhav) विजयी झाल्यानंतर महाविकास आघाडीने गुलालाची उधळण करत एकच जल्लोष सुरू केला आहे. एकीककडे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपच्या गोटात स्मशान शांतता पसरली आहे. इतकेच नाही तर या निवडणूक निकालानंतर आता मिम्सही व्हायरल होत आहे. कोल्हापुरात कुठेही निवडणूक लावा, निवडून नाही आलो तर सरळ राजकारण सोडून हिमालयात जाईल, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केलं होतं. त्यामुळे नेटकऱ्यांनी आता चंद्रकांत पाटील यांचे हिमालयात पोहोचल्याचे मिम्स तयार केले आहेत. पोहोचलो रे हिमालयात… असा मजकूर लिहिलेले आणि चंद्रकांतदादा बॅगेसहीत हिमालयावर बसलेले दिसत आहेत. तर काही व्हिडीओमध्ये काही लोक एका गाडीत सामान भरताना दिसत आहेत. त्यांना विचारल्यावर चंद्रकांत पाटील हे हिमालयात जात आहे. त्याची तयारी सुरू असल्याचं हा कार्यकर्ता म्हणताना दिसत आहे. हे मिम्स आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.
कोल्हापूर उत्तरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 12 एप्रिलला मतदान झालं. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना राज्यात पाहायला मिळाला. महा वकास आघाडीने ही जागा आपल्याकडे राहावी यासाठी प्रयत्न सुरु केले होते. तर एकही आमदार नसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा झेंडा रोवण्याचा चंग थेट चंद्रकांत दादांनी बांधला होता. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची निवडणूक राज्यपातळीवर लक्षवेधी बनली होती. कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही पोटनिवडणूक लावा, निवडून नाही आलो तर हिमालयात जाईल, असं वक्तव्य चंद्रकांतदादांनी केलं होतं.
चंद्रकांत पाटलांनी प्रतिष्ठेची केलेल्या कोल्हापूर उत्तरचा आज निकाल लागला. त्यात भाजप उमेदवाराचा पराभव झाला. तर जयश्री जाधव यांचा विजय झाला. त्यामुळे आता नेटकऱ्यांनी चंद्रकांतदादांच्या हिमालयात जाईल या विधानावर मिम्स तयार केले आहेत. एका मिम्समध्ये चंद्रकांत पाटील हे हिमालयात टी शर्ट आणि पँटवर ध्यानस्थ बसले आहेत. त्यांच्या बाजूला त्यांची बॅग आहे. आणि या फोटोला मी पोहोचलो रे हिमालयात अशी कॅप्शन दिली आहे. दुसरं मिम्सही असंच मनोरजंक आहे. हिमालय की गोद में असं शिर्षक असलेल्या या मिम्समद्ये चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांचे फोटो आहोत. सिनेमाच्या पोस्टर्स सारखंच हे पोस्टर्स करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या: