बीड: सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शैर्यतीवर बंदी घातलेली असतानाही, महाराष्ट्रात हा नियम मोडीत निघताना दिसत आहे. कारण, रविवारी कोल्हापुरात बैलगाडा शैर्यत घेण्यात आली तर सोमवारी (दि. 27) बीडमध्ये बैलगाडा शैर्यत भरवण्यात आली. विशेष म्हणजे, भाजपच्याच जिल्हाध्यक्षांनी या बैलगाडा शैर्यतीचं उद्घाटन केलं. बीडमध्ये झालेल्या या बैलगाडा शैर्यतीत तब्बल 25 गावातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. ( After Kolhapur, bullock cart race is organized in Beed )
बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा या बैलगाडा शैर्यतीचं आयोजन कऱण्यात आलं. बीड तालुक्यातील मांडवजाळी गावाजवळील एका शेतात ही शैर्यत पार पडली. पोलीस प्रशासनाची नजर चुकवत गावकऱ्यांनी आणि स्थानिक राजकारण्यांनी ही बैलगाडा शर्यत भरवली. विशेष म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनीच या शर्यतीचं उद्घाटन केलं.
कोल्हापुरातही नियम पायदळी तुडवत बैलगाडा शैर्यत
कोल्हापुरातही नियम पायदळी तुडवत बैलगाडा शैर्यत घेण्यात आली. विशेष म्हणजे बैलगाडा शैर्यत भरवताना हजारो रुपयांची बक्षीसं ठेवण्यात आले, आणि याची जाहिरातही करण्यात आली. आणि एवढं होऊनही पोलिसांना याची भनकही लागली नाही. राधानगरी तालुक्यातल्या केळोशी बुद्रुकमध्ये ही शर्यत भरवण्यात आली होती.
‘बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी द्या’, नितेश राणेंची मागणी
कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने दूर करण्यात येत आहेत. बैलगाडा शर्यती व बैलांची झुंज ग्रामीण भागातील लोकप्रिय व पारंपारिक कार्यक्रम आहेत आणि ते फार पूर्वीपासून साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमांनाही सुरू करण्याची परवानगी मिळावी. या कार्यक्रमांत बैलांना कोणत्याही प्रकारची इजा व दुखापत होणार नाही याची योग्य ती काळजी घेतली जाईल तरी या कार्यक्रमांना नियम व अटींच्या अधीन राहून सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
दुसरीकडे सातत्याने बैलगाडा संघटना आणि शेतकऱ्यांचीही बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी मागणी वाढते आहे. अशातच गृहमंत्री देशमुख यांना पत्रकारांनी याच विषयावर प्रश्न विचारले असता त्यांनी बैलगाडा शर्यत सुरु करण्याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया देताना वटहुकूम काढणार असल्याचं म्हटलं.
गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, ‘वटहुकूम काढणार’
बैलगाडा शर्यत सुरु करण्या संदर्भात काल पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठक झाली असून यासंदर्भात वटहुकूम काढून त्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केलाय, अशी प्रतिक्रिया वळसे पाटील यांनी दिलीय.
बैलगाडा शर्यत हा खरं तर सुप्रीम कोर्टात प्रलंबित प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये मागील आठवड्यामध्ये एक बैठक झाली होती. त्यामध्ये मी बोललेलो होतो. आता परत एकदा मुंबईला गेल्यावर आम्ही त्याचा पाठपुरावा केला, सुप्रीम कोर्टामध्ये चार ते पाच वेळा देशाच्या न्यायमूर्तींकडे अर्ज सादर केला आहे. ज्या वेळेला मुख्य न्यायमूर्ती 5 न्यायमूर्तींचे बेंच स्थापन करतील त्यावेळी आपण आपले सर्वात उत्तम वकील देऊ. एका बाजूला हा प्रयत्न आपण करु तर दुसऱ्या बाजूला कायद्यामध्ये काही सुधारणा करता येते का या दृष्टीकोनातून प्रयत्न करुन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं.
हेही वाचा: