शिवसेना नेता संजय निरुपम यांनी कॉमेडियन कुणाल कामराला धमकी दिली आहे. आज सकाळी 11 वाजता कुणाल कामराला चोपणार असा इशारा निरुपम यांनी टि्वटमधून दिला आहे. संजय निरुपम हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत. कुणाल कामरा याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गाण्यातून आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. संजय निरुपम यांनी मारहाण करण्यासंबंधीच हे टि्वट रविवारी केलं. कुणाल कामरा हा स्टँअप कॉमेडियन आहे. त्याने एका गाण्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटलं.
एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह गाण्यानंतर खवळलेल्या शिवसैनिकांनी द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेलमध्ये तोडफोड केली. या हॉटेलमध्ये कुणाल कामराचा स्टुडिओ होता. शिंदेंच्या शिवसैनिकांनी जे हॉटेल फोडलं, त्यात आता पुन्हा स्टँडअप कॉमेडी होणार नाही. रात्रीच शो चे बॅनरही हटवण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनपर गाणे कॉमेडियन कुणाल कामरा याने रचले होते.
हॉटेलमध्ये घुसून स्टुडिओ फोडला
त्यानंतर राहुल कनाल यांच्यासह शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी ‘द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेल’मध्ये घुसत स्टुडिओची तोडफोड केली. याप्रकरणी शिंदेच्या शिवसैनिकांवर गुन्हा देखील दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या हॉटेलची तोडफोड याअगोदर देखील अनेकदा झाली आहे, त्यामुळे असे शो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती.
Maharashtra ❤️❤️❤️ pic.twitter.com/FYaL8tnT1R
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 23, 2025
कोणाला अटक झाली?
या तोडफोडी प्रकरणी शिवसेना नेते कुणाल सरमळकर यांना खार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुणाल कामराच्या स्टुडिओमध्ये तोडफोड केल्यानंतर कुणाल सरमळकरला पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले आहे. कुणाल सरमळकरला खार पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
कुणाल कामराच्या या गाण्यावरुन महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिंदे यांची शिवसेना पूर्णपणे आक्रमक झाली आहे. संजय निरुपम यांनी कुणाल कामराला चोपण्याची धमकी दिली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना या गाण्यावरुन कुणालच कौतुक करताना शिंदे गटाला डिवचत आहे. संजय राऊत यांनी कुणालच हे गाण टि्वट करत ‘कुणाल का कमाल!’ जय महाराष्ट्र! असं टि्वट केलं आहे.
कुणाल कामराने गाण्यात काय म्हटलय?
कुणाल कामराने एका कार्यक्रमात महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल भाष्य केलं. यावेळी त्याने एकनाथ शिंदे यांनी पक्षात राहून जे बंड केलेलं, त्याचा उल्लेख केला. “आधी शिवेसना भाजपमधून बाहेर आली. मग, शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. एनसीपी एनसीपीमधून बाहेर पडली. एका मतदाराला 9 बटणं दिली, त्यात सगळे कन्फ्यूज झाले” असं त्याने म्हटलं.
कुणाल कामराने गाण अशा पद्धतीने लिहिलय की, यात एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्यात आलय. एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधणारे आक्षेपार्ह शब्द आहेत. त्यांना गद्दार म्हटलय. यामुळे शिवसैनिक आक्रमक झालेत.