अक्षय मंकनी, ठाणे | 16 नोव्हेंबर 2023 : शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी निवडणूक आयोगाने आचारसंहितेत काही बदल केला आहे का? असा सवाल केला आहे. कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशच्या निवडणुकीत मतदारांना अयोध्येतील रामल्लाचं मोफत दर्शन देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजप मध्य प्रदेश सरकारकडून रामाचे दर्शन मोफत घडवण्यात येणार असल्याचे वक्तव्य अमित शाह यांनी प्रचास सभेत केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने काही कारवाई केली नाही. त्यावरुन अमित शाह आणि आयोगावर उद्धव ठाकरे यांनी हल्ला केला. अमित शाह यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनीही आक्षेप घेतला. अमित शाह यांनी टूर अँड ट्रॅव्हल्स खाते सुरु केले आहे, असा उपरोधिक टोला लागावला. अमित शाह या विषयावर दोन कट्टर राजकीय विरोधक असलेले भावांचे एकमत दिसून आले.
अमित शाह यांनी मध्य प्रदेशातील भाषणात राम मंदिराचे दर्शन मोफत होणार असल्याचे आश्वासन दिले, त्यावर विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, अमित शाह यांनी टुर एण्ड ट्रॅव्हलस खाते उघडले दिसत आहे. तुम्ही काय कामे केली आहेत, त्यावर निवडणुका लढवा. राम मंदिरावर काय निवडणुका लढवतात. प्राचारात काय कामे केली आहेत ते सांगा.
राज्यात घाणेरडे राजकारण सुरु आहे. मला समजत नाहीये की राज्यात काय सुरु आहे. इतकी घाणेरडी परिस्थिती मी राजकारणात कधीच पाहिली नव्हती. राज्यातील मतदार येणाऱ्या निवडणुकीत काय भूमिका घेणार आहे, हे मला पहायचे आहे. सध्या उमेदवारांना मतदारांची भिती वाटत नाही. त्यामुळे ते हवे ते करतात. राजकीय लोक आता निर्ढावले आहेत. ते कायद्याला आणि मतदारांना जुमानत नाही. फक्त सुशिक्षित म्हणून चालत नाही सुसंस्कृतपण असावे लागते. बहिणीबाई चौधरी कमी शिकलेल्या असल्या तरी त्यांनी जे लिहून ठेवलं तो सुज्ञपणा होता, असे राज ठाकरे यांनी म्हटले.