Video : रेल्वे रुळावरच माशांचा मुक्त संचार; मुंबईतील व्हिडीओ तुफान व्हायरल

| Updated on: Jul 11, 2024 | 5:57 PM

गेल्या दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले होते. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले. या पावसामुळे मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल्वे रुळ तर पाण्याखाली गेले होते. असाच एका रेल्वे रुळाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात रुळावर मासे तरंगताना दिसत आहेत.

Video : रेल्वे रुळावरच माशांचा मुक्त संचार; मुंबईतील व्हिडीओ तुफान व्हायरल
fish
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दोन दिवसांपूर्वी पावसाने अक्षरश: मुंबईला झोडपून काढले. धुवाँधार पाऊस बरसला. त्यामुळे मुंबईतील सखल भागात प्रचंड पाणी साचलं. रेल्वे स्थानकातही पाणी भरलं. रेल्वे रुळ तर पाण्याखाली गेले होते. त्यामुळे रेल्वे ठप्प झाली आणि मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. एवढा पाऊस झाला की मुंबईत शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. मुंबईत पुन्हा रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यामुळे मुंबईकर चांगलेच भयभीत झाले होते. मात्र, अशातच मुंबईच्या रुळाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या रेल्वे रुळावर पाणी साचले असून त्यात माशा मुक्तपणे संचार करत असल्याचं दिसत आहे. पण या व्हिडीओची कुणीही पुष्टी केलेली नाहीये.

प्रचंड पावसामुळे मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांमध्ये पाणी भरलं होतं. रेल्वे ट्रॅक तर पाण्याखाली गेले होते. रेल्वे रुळाला लागून असलेले नालेही ओसंडून वाहत होते. मात्र, रेल्वे रुळावरील पाण्यात प्रवाशांना कॅटफिश मुक्त संचार करताना दिसली. त्यामुळे हे अनोखं दृश्य पाहण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडाली होती. लोक या मासळीचा व्हिडीओ बनवण्यातही मश्गुल झाले होते. ही फिश एखादा, नाला, खाडी किंवा नदीतून रुळावर आली असावी असं सांगितलं जातं.

रेल्वे स्थानक कोणतं?

रेल्वे रुळावर पहिल्यांदाच साचलेल्या पाण्यात मासे मुक्त संचार करताना दिसून आले. हा व्हिडीओ कोणत्या स्थानकातील आहे माहीत नाही. त्याला कुणीही दुजोरा दिला नाही. पण यूजर्सच्या मते हा व्हिडीओ मरीन लाइन्स रेल्वे स्थानकाचा आहे. असे नजारे रोज पाण्यासाठी आता मरीन ड्राईव्हवर रेल्वे स्थानक बनवा, असा सल्लाही एका यूजर्सने दिला आहे.

 

लाखवेळा पाहिला व्हिडीओ

हा व्हिडीओ @trainwalebhaiya नावाने शेअर करण्यात आला आहे. एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 7 लाख लोकांनी पाहिला आहे. यूजर्स व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. जेव्हा पाणी ओसरेल तेव्हा दुर्देवाने या फिश मरतील, असं एका यूजर्सने म्हटलं आहे. आता आम्ही वानखेडे स्टेडियममध्ये व्हेल मासे पाहायला उत्सुक आहोत, असं एकाने म्हटलं आहे. तर हे कोलकात्यात झालं असतं तर फायदेशीर ठरलं असतं. लोकांना फुकटात मासे मिळाले असते. पण दुर्देवाने हे मुंबईत होत आहे, असं एका यूजर्सने म्हटलं आहे.