महाराष्ट्राच्या प्रचारात मोदी, शाहांची एंट्री झालीय. योगी यांनी याआधी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला होता. आता मोदींनीही एक है तो सेफ है म्हटलं आहे. भाजपनं प्रचार कसा हिंदुत्वाच्या ट्रॅकवर नेलाय. मोदी आणि शाहांनी आपल्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातला प्रचाराचा अजेंडा सेट केला. भाजपचा प्रचार हिंदुत्वावरच असेल हे मोदी-शाहांनी दाखवून दिलं. बटेंगे तो कटेंगेच्या पुढे जात एक है तो सेफ वाली घोषणा मोदींनीही दिली.
पंतप्रधान मोदी यांची धुळे आणि नाशिकमध्ये सभा झाली. अमित शाह यांनी शिराळा, इचलकरंजी आणि सांगलीत मोर्चा सांभाळला. महाराष्ट्र लुटण्यासाठी गद्दारी करुन माझं सरकार पाडलं अशी टीका उद्धव ठाकरे प्रचार सभेतून करत आहेत. तर महाविकास आघाडीनंच धोका देवून महाराष्ट्राला लुटल्याचा निशाणा मोदींनी साधला.
आधी योगींनी महाराष्ट्रात बटेंगे कटेंगे अशी घोषणा दिली. मोदींनी एक है तो सेफ है म्हटलंय आणि फडणवीसांनी पुन्हा एकदा धुळ्यातून व्होट जिहादचा आरोप केला. व्होट जिहादपासून जागं व्हा नाही तर नेहमीसाठी झोपावं लागेल, असं फडणवीस म्हणाले आहेत.
शिराळाच्या सभेतून अमित हिंदुत्वाचा मुद्दा पुढं नेत. व्होट बँकेसाठीच अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे दर्शनाला आले नाहीत अशी टीका केली आहे.
लाडकी बहीण योजनेद्वारे महायुतीनं 2100 रुपये देण्याचा वायदा केला तर राहुल गांधी खटाखट 3 हजाराचं वचन दिलं. त्यावरुनही अमित शाहांनी आपल्या स्ट्राईलनं समाचार घेतला.
पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा यांच्याकडून प्रचाराला सुरुवात झालीय. दोघांनीही सुरुवातीला यापुढेही काँग्रेस आणि महाविकास आघाडीला हिंदुत्वावरुनच घेणार याची झलक दाखवून दिलीये.
दुसरीकडे आज अजित पवारांनी म्हटले की, पक्षात वेगवेगळे मतप्रवाह असतात. याबाबत मला कोणावर टीका करायची आहे. खोत हे भाजपचे नाहीत. ते महायुतीचे एक घटक आहेत. अलीकडे राजकारणातील स्तर घसरला आहे. सदाभाऊ खोत यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ती खूप वेगळी आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र नाहीयृ. हा फुले, शाहु, आंबेडकरांचा महाराष्ट्र असल्याने यांनी सर्व वर्गाला सोबत घेऊन जाण्याची शिकवण दिली आहे.