नंदुरबार : गेल्या अनेक दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार जिल्ह्यात आले असून त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार 3 हजार 600 पेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. जिल्ह्याती नुकसान झालेल्या शेतातील पिकांनुसार पंचनामे करण्यात येत असून शेतकऱ्यांना सरसकट भरपाई न देता पिकांच्या झालेल्या नुकसानीनुसार भरपाई देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधिमंडळाच्या अधिवेशनातच भरपाई संदर्भातली घोषणा करण्यात आली असल्याची माहितीही अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीप्रसंगी केली आहे.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी पुढची गुढी आपलीच असणार असल्याच्या वक्तव्य केले होते.
या वक्तव्यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर देताना सांगितले आहे की, संजय राऊत जीवनात कधीच खरं बोलत नाही जे आमच्या मतांवर निवडून आले आहेत त्यांनी आम्हाला शिकवण्याचं काम करू नये.
आणि त्यांच्यात हिंमत असेल तर दादा भुसे यांनी दिलेले चॅलेंज स्वीकारावे आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावे असा इशाराही त्यांना यावेळी दिला आहे. तुमच्या सरकार येईल आणि संजय राऊत आणि राजीनामा दिला नाही तर दोन-चार पिढी यांच्या सरकार येणार नाही. संजय राऊत यांच्या नातू जरी आला तरी सरकार येणार नाही ते असंही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी आनंदाचा शिधा देण्याबाबतच्या घोषणेवरूनही त्यांनी राज्य सरकारची भूमिका सांगितली. राज्य सरकारने आनंदाच्या शिधा देण्याची घोषणा केली आहे मात्र अनेक जिल्ह्यात आधुनिक आनंदाच्या शिधा पोहोचला नाही.
त्यांनाही हा शिधा पोहचवण्याचे काम केले जाणार आहे. ज्या भागात आनंदाचे शिधा शिल्लक राहिला आहे तो मात्र लवकरच नागरिकांना मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. एक ही कुटुंब आनंदाच्या शिदाविना वंचित राहणार नाही असंही अब्दुल सत्तार यांनी सांगितले.