अहमदनगर | 17 ऑक्टोंबर 2023 : अहमदनगर आणि आष्टी हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. या मार्गावर एका पॅसेंजर ट्रेनला सोमवारी अचानक आग लागली. ही रेल्वे अहमदनगरहून आष्टीकडे निघाली होती. त्यावेळी या पॅसेंजर ट्रेनला अहमदनगर सोलापूर ट्रॅकवर वाळूंजजवळ आग लागली. रेल्वेच्या पहिल्या दोन बोगींना ही आग लागली. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी अग्नीशमन दलाचे बंब दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे घाबरलेल्या प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या. त्यात काही जणांना किरकोळ जखमी झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही दुर्घटना घडली नाही.
अहमदनगर आणि आष्टी दरम्यान इंजिनानंतरच्या दोन डब्यांना आग लागली. आग लागल्याची घटना घडली तेव्हा गाडीत जास्त प्रवाशी नव्हते. ही आग इतकी भीषण होती की त्यात 2 बोगी जळून खाक झाल्या. ही रेल्वे अहमदनगर जिल्ह्यातच धावत होती. गाडीत केवळ पाच प्रवासी उपस्थित होते. त्यांना आग लागल्याचे लक्षात येताच ते घाबरले. त्यांनी धावत्या रेल्वेतून बोगीतून उड्या मारल्या. त्यात ते किरकोळ जखमी झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, पोलीस आणि अहमदनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुमारे 1 लाख लिटर पाण्याचा मारा करून 2 बोगींवरील आग आटोक्यात आणली. ही आग कशामुळे लागली त्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून अद्याप देण्यात आली नाही. या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे.
अहमदनगर आणि आष्टी दरम्यान वाळूंजजवळ रेल्वेच्या डब्याला आग लागली तेव्हा या गाडीत गर्दी नव्हती. गाडीत गर्दी असती तर मोठी दुर्घटना घडली असती. अहमदनगर आष्टी दरम्यान या रेल्वे सेवेला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नाही. यामुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, या घटनेची रेल्वे विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे.