Maratha Reservation Protest | मराठा आरक्षण आंदोलनाचा नवा अंक, कोपर्डीच्या पीडित निर्भयाच्या आईचं समाजाला महत्त्वाचं आवाहन

| Updated on: Oct 21, 2023 | 9:00 PM

कोपर्डी हत्याकांडातील पीडित चिमुकलीच्या आईने मराठा समजाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे पीडितेच्या आईने मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून देखील महत्त्वाचं आवाहन केलं आहे. त्यानंतर मनोज जरांगे कोपर्डी पीडितेच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती समोर आलीय.

Maratha Reservation Protest | मराठा आरक्षण आंदोलनाचा नवा अंक, कोपर्डीच्या पीडित निर्भयाच्या आईचं समाजाला महत्त्वाचं आवाहन
maratha reservation
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कुणाल जायकर, Tv9 मराठी, अहमदनगर | 21 ऑक्टोबर 2023 : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जाहीर सभा पार पडत आहे. मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन करत आहेत. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेला कालावधी संपत आला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील लवकरच महत्त्वाची भूमिका जाहीर करणार आहेत. यावेळी जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात? याकडे राज्य सरकारसह संपूर्ण मराठा समाज आणि जनतेचं लक्ष असणार आहे. मनोज जरांगे यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यामुळे मराठा समाज आरक्षणाच्या लढाईत आंदोलनासाठी सज्ज असल्याचं दिसत आहे. या दरम्यान कोपर्डी गावातून मोठी बातमी समोर आलीय.

कोपर्डी हत्याकांडातील पीडित चिमुकलीच्या आईने मराठा समजाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. आरक्षण लढ्यासाठी 25 ऑक्टोबरला कोपर्डी गावात एकत्र या, असं आवाहन निर्भयाच्या आईने केलं आहे. आरक्षण मिळालं नाही तर मीही उपोषणाला बसणार, असा इशारा निर्भयाच्या आईने सरकारला दिला आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षण आंदोलनाचा नवा अंक बघायला मिळण्याची शक्यता आहे.

‘निर्भयाच्या समाधीस्थळी एकत्र येऊन पुढील दिशा ठरवा’

निर्भयाच्या मृत्यूनंतर आरक्षण लढा सुरू झालाय. येत्या 25 ऑक्टोबरला निर्भयाच्या समाधीस्थळी एकत्र येऊन पुढील दिशा ठरवा, असं आवाहन निर्भयाच्या आईने केलं आहे. एकत्र येऊन पुढील आंदोलन ठरवू, असं निर्भयाची आई म्हणाली आहे.

मनोज जरांगे कोपर्डी गावाजवळ आले पण समाधीवर येऊ शकले नाहीत. अनेकांनी आम्हाला विचारलं जरांगे कधी भेटले का? विचारपूस केली का? पण आजपर्यंत ते आले नाहीत आणि भेटलेसुद्धा नाहीत, अशी खंत निर्भयाच्या आईने व्यक्त केली. दरम्यान, मनोज जरांगे पाटील कर्जत येथील सभा आटपून कोपर्डीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आलीय. मनोज जरांगे पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत.