Asaduddin Owaisi | ‘भारतातल्या मुस्लिमांना आज तेच वाटतय, जे….’, असदुद्दीन ओवैसी यांचं मोठ वक्तव्य

| Updated on: Feb 19, 2024 | 2:51 PM

Asaduddin Owaisi | "हे कुठल प्रेम आहे, तुम्ही मशिदीत चादर चढवणार, पण आमच्या मुलींच्या डोक्यावरुन हिजाब हिसकावून घेणार. आमच्याकडून मशीद हिसकावून घेण्याचे हे जे प्रयत्न सुरु आहेत, ते कोणत प्रेम आहे" अशा शब्दात ओवैसींनी हल्लाबोल केला.

Asaduddin Owaisi | भारतातल्या मुस्लिमांना आज तेच वाटतय, जे...., असदुद्दीन ओवैसी यांचं मोठ वक्तव्य
Asaduddin Owaisi
Follow us on

Asaduddin Owaisi | ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. महाराष्ट्रात अकोला येथे ते एका जनसभेला संबोधित करत होते. “मी संसदेत जे बोललो होत, त्याचाचा आज पुनरुच्चार करतो. हिटलरच्या काळात यहुदींना जे वाटायच तसच आज भारतातल्या मुस्लिमांना वाटतय” असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

“ख्वाजा अजमेरीच्या दर्ग्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चादर चढवतात. पण ख्वाजा अजमेरीवर हे तुमच कोणत प्रेम आहे की, तुम्ही मशीद आमच्याकडून हिसकावून घेताय. हे कुठल प्रेम आहे, तुम्ही मशिदीत चादर चढवणार, पण आमच्या मुलींच्या डोक्यावरुन हिजाब हिसकावून घेणार. आमच्याकडून मशीद हिसकावून घेण्याचे हे जे प्रयत्न सुरु आहेत, ते कोणत प्रेम आहे” अशा शब्दात ओवैसींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

या देशात भाजपाला काय करायचय?

“दिल्लीत एका 500 वर्ष जुन्या मशिदीला कुठल्याही नोटीसशिवाय शहीद करण्यात आलं. 600 वर्ष जुनी मशीद आणि कब्रस्तानला शहीद केलं गेलं. मला विचारायचय या देशात भाजपाला काय करायचय? नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून डाटाचा आकडा काय सांगतो ते पाहा? हायर एजुकेशनमध्ये 1 लाख 80 हजार मुस्लिमांचा सहभाग नाहीय” असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

‘सर्वोच्च न्यायालयाने आस्थेच्या आधारावर निर्णय दिला’

‘ज्ञानवापी मशिदीच्या बाबतीत काय होतय ते आपण पाहतोय’ असं ओवैसी म्हणाले. “सर्वोच्च न्यायालयाने आस्थेच्या आधारावर निर्णय देऊन संपूर्ण देशाला संदेश दिला की, आस्था मोठी आहे. पुरावे पाहिले नाहीत. स्वत:साठी मशिदी कायम ठेवण्याच मी तुम्हाला आवाहन करतो” असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

‘तेव्हा तुमच्या डोक्यात धर्मनिरपेक्षात येते’

“महाराष्ट्र विधानसभेत फक्त एक असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील नको, तर असे 50 ओवैसी आणि जलील पाहिजेत. तुम्ही सगळे सभेला येतात, पण मतदान करण्याची वेळ येते, तेव्हा तुमच्या डोक्यात धर्मनिरपेक्षात येते. संविधानात लिहिलेल्या धर्मनिरपेक्षतेला मी मानतो” असं ओवैसी म्हणाले.

‘देव ना करो, अशा हजारो मशिदी जातील’

“धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली तुम्ही मशिदी गमावल्या. एक मशीद गेली, देव ना करो, अशा हजारो मशिदी जातील” अकोल्यातून त्यांनी एआयएमआयएमच्या कमीत कमी 4 उमेदवारांना लोकसभेला जिंकवण्याच अपील केलं.