Indigo Bomb Threat: काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी आली होती. आता इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकी आली. यामुळे मध्य प्रदेशातील जबलपूर येथून हैदराबादला जाणाऱ्या विमानाचे नागपूर विमानतळावर आप्तकालीन लँडींग करण्यात आले. इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. विमानातील सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. विमान नागपूरला उतरवल्यानंतर कठोर तपासणी करण्यात आली. त्यात काहीच आढळून आले नाही. आता धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
जबलपूर येथून हैदराबाद येथे जाणारी फ्लॉइट 6E 7308 मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी रविवारी मिळाली. त्यानंतर हैदराबादकडे निघालेले हे विमान नागपूर विमानतळकडे डायवर्ट करण्यात आले. नागपूर विमानतळावर विमानाचे आप्तकालीन लँडींग करण्यात आले. त्यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. विमानाची तपासणी करण्यात आली.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बॉम्बची धमकी एका कागदाच्या तुकड्यावर मिळाली. हा कागद विमानाच्या बाथरुममध्ये मिळाला. त्यामुळे विमान नागपूरला उतरवून सुरक्षा एजन्सीने कठोर तपासणी केली. त्यात काहीच आक्षेपार्ह मिळाले नाही. त्यानंतर दुपारी दोन वाजता विमान हैदराबादकडे रवाना करण्यात आले.
Flight 6E 7308 operating from Jabalpur to Hyderabad was diverted to Nagpur due to a bomb threat. Upon landing, all passengers were disembarked and mandatory security checks were promptly initiated…" IndiGo pic.twitter.com/X8VUnGV6dZ
— ANI (@ANI) September 1, 2024
22 ऑगस्ट रोजी मुंबईवरुन येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरवून तपासणी केली गेली. त्यात काहीच मिळून आले नाही. त्यावेळीही विमानाच्या शौचालयामध्ये एक टिशू पेपरवर बॉम्बची धमकी मिळाली होती. धमकी मिळालेली एअर इंडियाच्या फ्लाइट AI 657 मध्ये135 प्रवाशी होते. एअर इंडियाने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले होते की. AI 657 (BOM-TRV) मध्ये 22 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7.30 धमकी मिळाली. त्यानंतर विमानाची लँडींग तिरुवनंतपुरम विमानतळावर सकाळी 7.36 वाजता केली गेली. त्यात काहीच आढळून आले नाही.