जरांगे पाटील चुकलात, तुम्ही चिटर आहात, तुम्ही संभाजी राजेंनाही सोडले नाही…अजय महाराज बारसकर यांचा हल्लाबोल

| Updated on: Feb 26, 2024 | 1:14 PM

ajay maharaj baraskar | माझ्या आणि फडणवीस यांचा काय संबंध आहे. त्यांची विचारधारा वेगळी आहे. माझी विचारधारा वेगळी आहे. माझ्यासारखी टीका आतापर्यंत त्यांच्यावर कोणीच केली नाही. माझे आधीचे व्हिडिओ पहा. २०१७ मध्ये आणि त्यानंतर अनेक वेळा फडणवीस यांची भेट घेतली. पण कशासाठी...

जरांगे पाटील चुकलात, तुम्ही चिटर आहात, तुम्ही संभाजी राजेंनाही सोडले नाही...अजय महाराज बारसकर यांचा हल्लाबोल
अजय महाराज
Follow us on

मुंबई, दि. 26 फेब्रुवारी 2024 | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचे एकेकाळचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील तुम्ही चुकलात. तुम्ही संभाजी राजेंनाही सोडले नाही. नाटकातील पैसे खाल्ले. तुम्ही चिटर आहात. आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांना जबाबदार कोण आहेत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात अरविंद केजरीवाल यांची एन्ट्री झाली. मग त्याचे काय झाले. त्यावरुन लक्षात घ्या, असा सल्लाही अजय महाराज यांनी दिला. तसेच आपण फडणवीस यांचे व्यक्ती असल्याचा सर्व आरोप खोडून काढले.

काय म्हणाले अजय महाराज बारसकर

जरांगे पाटील तुम्ही पेटवणारे आहेत तर आम्ही विझवणारे आहोत. तुम्ही तोडणारे आहे तर आम्ही जोडणार आहोत. तुम्ही झुंडशाहीचे समर्थक आहेत. तर आम्ही कायद्याचे अन् संविधानाचे समर्थक आहोत. आम्ही तुम्हाला उणीवा दाखवत आहोत. दोष दाखवत आहे. तुमच्यात काय गुण आहे. जे चांगले गुण होते ते सोडून दिले.

आता तुम्ही स्वत: हेकेखोरपणा, अतितायीपणा केल्याची कबुली दिली आहे. काल रागाच्या भरात उठले. तमाशा केला. त्यानंतर सर्व समाजाचा अपमान झाला आहे. आतापर्यंत एकही नेता तुमच्यावर टीका करत नव्हता. आता तुमच्यावर प्रचंड टीका होऊ लागली. हा तुमचा अपमान नाही, तुमच्या पाठीमागे असणाऱ्या सर्व समाजाचा अपमान आहे. यामुळे आम्ही बोलत होतो.

हे सुद्धा वाचा

चौथ्या दिवशी अन् पंधराव्या दिवशी

उपोषणाच्या चौथ्या दिवशी दोन माणसे तुम्हाला नेते होती. आता रविवारी उपोषणाच्या १५ दिवसानंतर तुम्ही १५ माणसांचे ऐकत नव्हता. सरळ उठून चालू लागला होता. काय चालले आहे तुमचे. माझ्यावर आरोप केले. कुठे ती माऊली जिच्यावर अत्याचार केला. ३०० कोटी रुपयांचा आरोप केला. कुठे आहे ते पैसे, कुठे आहे याबाबतचे पुरावे. आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. तुम्ही सर्व बिगर पुराव्याचे बोलतात, अशी टीका मनोज जरांगे यांच्यावर अजय महाराज यांनी केली.

फडणवीस अन् माझा काय संबंध

माझ्या आणि फडणवीस यांचा काय संबंध आहे. त्यांची विचारधारा वेगळी आहे. माझी विचारधारा वेगळी आहे. माझ्यासारखी टीका आतापर्यंत त्यांच्यावर कोणीच केली नाही. माझे आधीचे व्हिडिओ पहा. २०१७ मध्ये आणि त्यानंतर अनेक वेळा फडणवीस यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी ही भेट होती. एकवेळा नाही तर अनेक वेळा भेट घेतली आहे. मारुतीच्या मंदिरात बसून आरक्षण मिळत नाही. त्यासाठी सरकार दरबारी, न्यायालयात जावे लागते, असा टोला अजय महाराज यांनी लगावला.