हा भेदभाव नाही तर काय? शरद पवार यांना अजित पवार यांनी सुनावले

| Updated on: Nov 12, 2024 | 2:39 PM

ajit pawar sharad pawar: बारामती विधानसभा निवडणुकीसाठी योगेंद्र पवार यांचा फॉर्म भरला. त्यावेळी स्वत: शरद पवार उपस्थित होते. परंतु मी आठ वेळा फॉर्म भरला. सुप्रिया सुळे यांनी चार वेळा फॉर्म भरला. रोहित पवार यांनी दोन वेळा फॉर्म भरला. तेव्हा ते नव्हते.

हा भेदभाव नाही तर काय? शरद पवार यांना अजित पवार यांनी सुनावले
ajit pawar sharad pawar
Follow us on

ajit pawar sharad pawar: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी परिवारांमध्ये लढती होत आहे. परंतु बारामती विधानसभेची लढत सर्वात लक्षवेधी ठरत आहे. राजकारणातील एकाच परिवारातील दोन मुरब्बी नेत्यांनी या ठिकाणी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी बारामतीची जागा जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद लावली आहे. आता मंगळवारी अजित पवार यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. शरद पवार परिवारात कसा भेदभाव करतात, ते त्यांनी बोलून दाखवले. बारामतीत अजित पवार विरुद्ध त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार निवडणूक रिंगणात आहे.

काय म्हणाले अजित पवार

बारामती विधानसभा निवडणुकीसाठी योगेंद्र पवार यांचा फॉर्म भरला. त्यावेळी स्वत: शरद पवार उपस्थित होते. परंतु मी आठ वेळा फॉर्म भरला. सुप्रिया सुळे यांनी चार वेळा फॉर्म भरला. रोहित पवार यांनी दोन वेळा फॉर्म भरला. तेव्हा ते नव्हते. शेवटी घरातील लोकांना एकसारखी वागणूक देत नसतील तर हा भेदभाव नाही का? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

माझ्यासुद्धा बॅगांची तपासणी

उद्धव ठाकरे यांच्या बॅगा वणी येथे निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी तपासल्या. त्यावरुन शिवसेना उबाठा आणि शरद पवार गटाकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यावर उत्तर अजित पवार यांनी दिले. ते म्हणाले, माझ्यापण बॅगा तपासल्या आहे. मी परभणीला असताना माझ्या बॅगा तपासल्या गेल्या होत्या. निवडणूक आयोगाला तो पूर्ण अधिकार आहे. लोकसभेला मुख्यमंत्र्याच्या बॅगासुद्धा तपासल्या गेल्या होत्या. आमच्या सोबत पोलिसांच्या गाड्या असतील तर त्याही तपासल्या पाहिजे.

रवी राणा यांना समज द्यावी

अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काही होत नाही, असे वक्तव्य रवी राणा यांनी केले होते. त्यावरुन महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रवी राणांना अजित पवारांनी चांगलेच फटकारले. त्यावर अजित पवार म्हणाले, रवी राणा विनाशकालीन विपरीत बुद्धी झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना योग्य पद्धतीने समज द्यावी. रवी राणा यांच्या स्वतःच्या बोलण्यातून ते त्यांच्या पत्नीच्या पराभवाला कारणीभूत आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले.