Ajit Pawar: महायुतीचा पहिला उमदेवार जाहीर, अजित पवार यांनी आघाडी घेत फोनवरुन केली या उमेदवाराची घोषणा

| Updated on: Sep 30, 2024 | 12:29 PM

maharashtra assembly election 2024: लोकसभा निवडणुकीत तुतारीला मदत करणारे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाषण सुरु होते. त्यावेळी अजित पवार यांनी फोनद्वारे दिपक चव्हाण यांची उमेदवार म्हणून घोषणा केल्याने सर्वच जण अचंबित झाले आहेत.

Ajit Pawar: महायुतीचा पहिला उमदेवार जाहीर, अजित पवार यांनी आघाडी घेत फोनवरुन केली या उमेदवाराची घोषणा
Eknath shinde, ajit pawar and devendra fadnavis
Follow us on

महायुतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अन् भाजपमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. विद्यामान आमदार असलेले मतदार संघ त्या, त्या पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. महायुतीमधील पक्षांत उमेदवार जाहीर करण्यात अजित पवार यांनी आघाडी घेतली आहे. अजित पवार यांनी साताऱ्यामधील फलटण विधानसभा मतदार संघातील उमदेवार जाहीर केला आहे.

फोनवरुन जनतेशी साधला संवाद

फलटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थित राहणार होते. परंतु त्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही. मात्र त्यांनी सभेत फोनवरुन नागरिकांसोबत संवाद साधला. त्यावेळी आगामी फलटण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा केली. अजित पवार यांनी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीची घोषणा होताच सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाषणा दरम्यान उमदेवारीची फोनवरुन घोषणा

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तुतारीला मदत करणारे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाषण सुरु होते. त्यावेळी अजित पवार यांनी फोनद्वारे दीपक चव्हाण यांची उमेदवार म्हणून घोषणा केल्याने सर्वच जण अचंबित झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले अजित पवार

अजित पवार यांनी फोनवरुन बोलताना सांगितले की, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तुमचे गाव फलटण विधानसभा मतदारसंघात आहे. या मतदार संघात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. विधानसभा निवडणुकीत दीपक चव्हाण हे उमेदवार आहेत. तुम्ही त्यांना आशीर्वाद द्यावेत आणि सहकार्य करावे. त्यांना संधी दिल्यानंतर तुमच्या मतदार संघ अन् जिल्ह्यासाठी लागणारा करोडो रुपयांचा निधी देईन. माझ्यावर विश्वास ठेवावा. मायमाऊलींना भाऊबीजेची ओवाळणी दिल्याशिवाय तुमचा भाऊ गप्प बसणार नाही.

साताऱ्यात रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष वाढलेला आहे. तो लोकसभा निवडणुकीत दिसून आला. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार असताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला नव्हता. निंबाळकर कुटुंबाने उघडपणे धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता. सोमवारी अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या चेहऱ्यावर हास्य आले.