सयाजी शिंदे यांचा पक्षप्रवेश होताच अजित पवारांची मोठी घोषणा, दिली ‘ही’ जबाबदारी

| Updated on: Oct 11, 2024 | 7:11 PM

दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सयाजी शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी अजित पवार यांनी त्यांच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याची घोषणा केली आहे.

सयाजी शिंदे यांचा पक्षप्रवेश होताच अजित पवारांची मोठी घोषणा, दिली ही जबाबदारी
सयाजी शिंदे यांचा पक्षप्रवेश होताच अजित पवारांची मोठी घोषणा
Follow us on

ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर अजित पवार यांनी भूमिका मांडली. यावेळी अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. “सयाजीरावांना कोणत्या जबाबदाऱ्या द्यायच्या याची चर्चा झाली. विधानसभेत त्यांना पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून कार्य देणार आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासाबाबत त्यांनी विचारलं. त्यांच्याशी आमची व्यवस्थित चर्चा झाली आहे. मी जबाबदारीने सांगतो, राष्ट्रवादीत सयाजीराव शिंदे यांचा आदर आणि सन्मान राखला जाईल. त्यात अडचण येणार नाही. कार्यकर्त्यांकडूनही येणार नाही. मी आज एक चांगला निर्णय घेतला आहे. मला त्याचं समाधान आहे”, अशी भूमिका अजित पवार यांनी यावेळी मांडली.

“सयाजी शिंदे यांचा राजकारणातील प्रवास यशस्वी होईल. आपण एकत्र येऊन नवीन अध्याय लिहू. त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. सर्वांना बरोबर घेऊन जायचं ही आपली भूमिका आहे. फुले, आंबेडकरांची विचारधारा ढळू द्यायची नाही. हा आमचा प्रयत्न आहे. एक चागंला निर्णय झाला”, असं मत अजित पवार यांनी यावेळी मांडलं.

सयाशी शिंदे यांनी अजित पवारांना काय सुचवलं?

“मी जास्त चित्रपट पाहत नाही. पण मी सयाजीरावांचे काही सिनेमे पाहिले. प्रत्येकाला अभिनेते अभिनेत्री आवडते. सयाजीरावांनी वेगळ्या प्रकारचा ठसा निर्माण केला. राज्यातील कोणत्याही व्यक्तीने एखाद्या क्षेत्रात ठसा उमटवला तर अभिमान वाटतो. आपली माणसं नाव लौकीक निर्माण करतात याचा अभिमान वाटतो. सयाजी शिंदे यांच्या चित्रपटाने जागरूकता निर्माण केली आहे. त्यांनी सामाजिक कार्यातही ओतून घेतलं आहे. त्यांची माझी अनेक वर्षापासूनची ओळख आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“सत्तेत असताना अनेक लोक भेटतात. विविध कामासाठी येतात. सयाजी शिंदे यांना झाडांची आवड आहे. ते झाडे लावण्याचं काम करत आहे. मी काही भागात जाऊन त्यांचं काम पाहिलं आहे. पण अनेकदा स्थानिक प्रश्न तर कधी सरकारी अधिकारी मध्ये अडचणी करतात. आम्ही याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी अनेक कल्पना मांडल्या. ते म्हणाले सिद्धिविनायक, साईबाबाला अनेक लोक येतात. आपण लोकांना प्रसाद देतो. त्याऐवजी रोपटं प्रसाद म्हणून द्यायचं. देवाचं रोपटं म्हटलं तर लोकं घरी घेऊन जातील आणि रोपटं वाढवतील. आपोआपच झाडांची लागवड होईल”, असं अजित पवारांनी सांगितलं.